नवा जिल्हा, तालुक्यांची निर्मिती करण्याची दांगट समितीला शिफारस करा; कृती समितीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन!

पुसदःवाढत्या लोकसंख्येनुसार नवे जिल्हे आणि नव्या तालुक्यांची निर्मिती करण्याचा विचार सरकार करत असून यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून. या समितीला अहवाल पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महसूलमंत्र्यांनी विधान परिषदेत दिली दांगट समितीने अहवालामध्ये भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेल्या यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात यावा व नवीन जिल्हा निर्मितीचा प्रश्न सोडवून जनतेच्या सोयीसाठी प्रशासनिक कारवाई लवकर करण्यात यावी अशी शिफारस करावी अशी मागणी पुसद जिल्हा कृती समितीच्या वतीने सदस्य अशोक शंकरराव बाबर यांनी आज उपविभागीय अधिकारी लोक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. राज्यात अप्पर तहसील कार्यालयांच्या निर्मितीची मागणी सातत्याने होत असून या संदर्भात ५३ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या संदर्भात धोरणात्मक निर्णयासाठी निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिती २५ जुलैपर्यंत अहवाल देणार असून अप्पर तहसील स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल, तसेच पदनिर्मिती करणे, पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत का आणि प्राधान्यक्रम कोणाला द्यावा, या संदर्भात ही समिती सरकारला शिफारस करणार आहे. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे दांगट समितीने अहवालामध्ये भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेल्या यवतमाळ जिल्ह्याचे विभाजनहकरून पुसद हा नवीन जिला निर्माण करण्यात यावा व नवीन जिल्हा निर्मितीचा प्रश्न सोडवून जनतेच्या सोयीसाठी प्रशासनिक कारवाई लवकर करण्यात यावी अशी न शिफारस करावी ही पुसद जिल्हा कृती समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात २०१८ मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करन नव्या जिल्ह्यांच्य निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला गेला होता. या समितीने २२नवे जिल्हे आणि ४९ नवे तालुके निर्मितीचा प्रस्ताव दिला होता, तसेच समितीने लोकसंख्या आणि क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन तसेचपुसद हा नवीन जिल्हा करण्याची शिफारसही केल्याचं सांगण्यात येत होते. प्रस्तावित पुसद जिल्ह्याचा संपूर्ण आराखडा तयार झाला असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पुसर्दा जिल्हा होण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावामध्ये सकारात्मकबाबी आढळून आल्या आहेत. त्यामुळे पुसद जिल्ह्याची मागणी ही पूर्ण होण्यास पात्र ठरल्याची माहिती आहे. मात्र या निर्णयावर पुढं काहीही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे २५ जुलै पूर्वी दांगट समितीने पुसद जिल्हा निर्मिती संदर्भात अहवाल द्यावा अशी मागणी कृती समितीचे अध्यक्ष अशोक बाबर यांनी उपविभागीय अधिकारी पुसद यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.