राष्ट्रीय लोकअदालतमधून झाली पुसद पंचायत समितीच्या अधिकार क्षेत्रातील ग्रामपंचायतींची उच्चांकी थकबाकी वसुली!

पुसद : येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत या उपक्रमातून पंचायत समिती अधिकार क्षेत्रातील १२० ग्रामपंचायती पैकी ९२ग्रामपंचायतींची २३लाख ८३हजार ०८१/- रुपयाची थकबाकी वसुल झाल्याच्या माहिती समोर आली आहे.
तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती रामगडिया मॅडम यांच्या शुभहस्ते आज राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या भव्य उद्घाटन पार पडले या लोक अदालतीच्या माध्यमातून पुसद पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या थकबाकी वसुलीचे विक्रमी संख्येने दाखलपूर्व दावे सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते, त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंतच्या लोक अदालतमधील प्रकरणांमध्ये उच्चांकी थकबाकी वसुली ग्रामपंचायतींना मिळाली आहे. 
न्यायालयाच्या कामकाजाबाबत तारीख पे तारीख हा फिल्मी डायलॉग तुम्ही अनेकदा ऐकला असेल. पण, हे विधान कालबाह्य ठरविण्याची किमया आज पुसद न्यायालयातील राष्ट्रीय लोकअदालतीने साधली शनिवारी (दि.१३) तालुक्यातील न्यायालयांमध्ये झालेल्या लोकअदालतीत सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत अनेक खटले तडजोडीने निकालात निघाले
पुसद पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील १२० ग्रामपंचायती मधील गावांतील करभरणा न करणाऱ्या ग्रामस्थांसाठी पुसद येथे राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार १३ सप्टेंबर रोजी ही राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील १२०ग्रामपंचायती पैकी ९२ ग्रामपंचायतीतील थकीत घरपट्टी, पाणीपट्टीबाबतची प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली आहे यामध्ये पहिल्या नंबर वर काकडदाती ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीने ५लाख६५हजार ६२४ रुपये वसुली झाली आहे तर दुसऱ्या नंबर वर धनकेश्वर ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीमध्ये ९३ हजार ३३९ रुपये तर तिसऱ्या नंबर वर शेंबाळ पिंपरी ग्रामपंचायत ८९ हजार ५५९ रुपये व चौथ्या नंबरवर चोंढी ग्रामपंचायत ८६ हजार ७१२ रुपये आणि पाचव्या नंबर वर बेलोरा ग्रामपंचायतीमध्ये ७९हजार६१९रुपये वसुली झाली आहे.१२० ग्रामपंचायत पैकी ९२ ग्रामपंचायत मध्ये एक हजार प्रकरणाचा या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निपटारा करण्यात आलाअसुन या ग्रामपंचायतींची एकुण २३लाख८३हजार ०८१/- रुपयाची थकबाकी वसुल झाल्याच्या माहिती समोर आली आहे.या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल कुमार आंदेलवाड, विस्तार अधिकारी व्हि.एन.पिंपळे,एस.डी. डाखोरे,ए.आर.शेख, ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक संघटना पदाधिकारी टि.पी.राठोड, ग्रामविकास अधिकारी अश्विन तांबडे, अदि पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी अर्थात परिश्रम घेतले.



