पुसद येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चरण पादुका पालखीचे जल्लोषात स्वागत;श्री गुरुदेव सेवा मंडळाचा पुढाकार,

पुसद :आषाढी एकादशीनिमित्त गुरुकुंज आश्रम, मोझरी(जि अमरावती ) ते पंढरपूर येथे जाणाऱ्या मानवतेचे महान पुजारी, ग्रामगीता निर्माते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका पालखीचे आज शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.गुरुदेव सेवा मंडळ, पुसद तालुका शाखेच्यावतीने स्थानिक देशमुखनगरातील मंडळाच्या सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनास्थळी राष्ट्रसंतांच्या चरण पादुकासह पंढरपूर प्रचार यात्रा पोहोचताच मंडळाचे अध्यक्ष प्रा प्रकाश लामणे यांनी सपत्नीक चरण पादुकांचे पूजन करून महाआरती करण्यात आली.
त्यानंतर उपस्थित सर्व अनुयायांनी चरण पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी गुरुदेव अनुयायांनी दिलेल्या वंदनीय तुकडोजी महाराज की जय, सब साधू संतन की जय, भारत माता की जय, आदी गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.
याप्रसंगी पालखी प्रवासाचे व्यवस्थापन व आयोजक सुशील महाराज वनवे यांनी आपल्या मनोगतातून ध्यान, प्रार्थना, कीर्तन, भजन, प्रवचन व लेखन साहित्याद्वारे राष्ट्रसंतांचे विचार जनतेपर्यंत पोहचविणे हेच आपले कर्तव्य असल्याचे सांगत गुरुदेव अनुयायांनी मनात कोणतीही कटुता न ठेवता एकदिलाने गुरुदेव सेवा मंडळाची वृद्धी करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष
प्रा प्रकाश लामणे यांनी केले.
यावेळी पालखी पुजारी एकनाथ महाराज गावत्रे, राजेंद्र महाराज कठाळे, राजेंद्र महाराज गाडगे, सुखदेव महाराज इंगोले, डॉ ज्ञानेश्वर मुळे, वसंतराव बोराडे, गजानन इंगळे, सुशील बुरडे, रथ चालक अजय यादव आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुसद शहर व तालुक्यातील गुरुदेव अनुयायी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष प्रा प्रकाश लामणे, उपाध्यक्षद्वय नंदकुमार पंडित व मनोहर बनस्कर, सचिव एड गजानन साखरे, संघटक गजानन जाधव,कोषाध्यक्ष सुरेश कदम, प्रचारक नरेश ढाले व किसन गरडे, सदस्यगण शरद राऊत, अनिल अस्वार, ज्ञानेश्वर सुरडकर, प्रमोद देशमुख, वसंता काळेकर, दिवाकर मोरे,अरविंद देशमुख,पांडुरंग शिनगारे, ज्ञानेश्वर इंगोले, विठ्ठलराव येवले, मधुकर अजमिरे,
महिला प्रतिनिधी छाया प्रकाश लामणे
मंगलाताई पंडित,चंदाताई गोडसे, जयाताई मोरे, चारुताई देशमुख, शिलाताई जाधव आदींनी पुढाकार घेतला.



