श्रिरामपुर ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांना धनादेश वाटप!

पुसद: शहराला लागून असलेल्या श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या वतीने उत्पन्नाच्या पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींसाठी या उपक्रमांतर्गत हद्दीतील गावातील जवळपास ६०दिव्यांगांना धनादेश वाटप करण्यात आले.‘‘थोडाफार का असेना ग्रामपंचायतीने दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात देण्याचे लगातार सत्र सुरू केले आहे.’’
पुसद शहराला लागून असलेल्या श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच आशिष काळबांडे यांच्या पुढाकाराने ‘थोडाफार का असेना ग्रामपंचायतीने दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात देण्याचे सत्र सुरू केले आहे.’’राज्य सरकारने नियोजित केलेल्या दिव्यांग टक्केवारीनुसार ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींसाठी या उपक्रमांतर्गत हद्दीतील गावातील दिव्यांग नागरिकांना दि.१५ जून २०२४ रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील सभागृहात जवळपास ६० दिव्यांगाना व्यक्तींना प्रत्येकी २०००/- (दोन हजार) रुपये प्रमाणे धनादेशाचे वाटप करण्यात आले. हा निधी दिव्यांग लाभार्थ्यांना मागील तीन वर्षापासून सातत्याने वाटप केला जात आहे.
प्रथम वर्षी१००० /- रु. द्वितीय वर्षी १५००/ रु. तसेच यावर्षी २००० /- रुपये प्रमाणे धनादेशाचे वाटप करण्यात आले. तर तालुक्यातील ग्रामपंचायत आहे की जी लगातार दिव्यांगाना आपल्या ग्रामपंचायतीच्या मिळकतीच्या उत्पन्नापैकी दिव्यांग निधी राखीव ठेवून दिव्यांगांना धनादेश वाटप करीत आहे.
तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने सामूहिक लग्न मेळावे घेऊन दिव्यांगाना प्राधान्य दित आहेत. ग्रामपंचायत श्रीरामपूर व गुरुदेव सेवा मंडळ श्रीरामपूर यांचे संयुक्त विद्यमाने असे समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जात असुन लग्नाचा खर्च हा ग्रामपंचायत श्रीरामपूर व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या सेवाभावी वृत्तीनेमुळे सुरू असून ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकास कामे सुरू आहेत. तालुक्यातील पहिली ग्रामपंचायती अशी आहे की विकास निधी जास्तीत जास्त फंड खेचून आणल्याने ग्रामपंचायत च्या हद्दीत विकास कामाचा सपाटा सुरू आहे. या विकास कामासाठी पुसद मतदारसंघाचे लोकनियुक्त आमदार इंद्रनील नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तर ग्रामपंचायतचे सरपंच आशिष काळबांडे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतिने विकास कामात भरभराटी घेतली आहे. दिव्यांगांना विकास निधी वाटप करताना ग्रामपंचायतचे सरपंच अशीष काळबांडे, उपसरपंच, ग्राम विकास अधिकारी अविनाश भगत, व ग्राम पंचायतीचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.