पुसदच्या शिरपेचात मानाचा तुरा! पल्लव आनंद शिरमवार नॅशनल व इंटरनॅशनल सिप अबॅकस स्पर्धेत जगात चमकला!

पुसद :येथील तिरुपती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व प्रतिष्ठित व्यावसायिक आनंद शिरमवार यांचा चिरंजीव पल्लव आनंद शिरमवार यांनी १० नोव्हेंबर रोजी नुकत्याच पार पडलेल्या२१ व्या नॅशनल व इंटरनॅशनल ( आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय) सिप अबॅकस स्पर्धेमध्ये जगातून पहिला येण्याचा मान मिळवला त्यामुळे पुसदच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या स्पर्धेमध्ये जगातील ११ देशामधून व भारतातील संपूर्ण राज्यातून जवळपास ९०००हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.त्यामध्ये पुसद येथील देशमुख सरांच्या सिप अबॅकस अकॅडमी मध्ये शिक्षण घेणारा पल्लव आनंद शिरमवार हा जगातून पहिला आला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विजय संपादित केला आहे चि पल्लव हा पुसद येथील नामांकित स्कूल ज्योतिर्गमय इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थीअसून तो जगात चमकल्याने त्याच्या या यशाचे श्रेय त्याचे आई-वडील व काका काकू आजी सिप अबॅकस मधील शिक्षकांना व शाळेतील शिक्षक वृंदांना तसेच शाळेच्या संचालकांना दिले आहे.



