ईतर

पुसद अर्बन को-ऑप.बँकेची ४२ वी आमसभा संपन्न

पुसद: अर्बन को-ऑप.बँकेची ४२ वी आमसभा को-ऑप.बँकेचीआज दि.५ ऑगस्ट २०२५ रोजी पुसद येथील साई मंगलम साई मंदिर येथे उत्साहत संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष श्री शरद मैंद होते.सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज ,हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक व बँकेचे संस्थापक स्व. श्रीराम अप्पाजी आसेगांवकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलना नंतर यावर्षी विमान दुर्घटनेत दिवंगत झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी व इतर प्रवाशी व निवासी डॉक्टर्स तसेच माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग, रतनजी टाटा,पुसदचे नरेंद्र उपाख्य बाळासाहेब मुखरे, बँकेचे ठेवीदार,सभासद यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्या नंतर पुसद अर्बन बँक परिवारातील मागील १७ वर्षापासुन बँकेचे संचालक असलेले ललित सेता यांची पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याबद्दल व सामाजिक उपक्रम समितीचे सदस्य अमोल व्हडगीरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

मागिल आमसभेचा वृत्तांत मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर यांनी वाचून दाखविला. त्यानंतर बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी सन २०२४-२५ या वर्षाच्या कामकाज अहवाल ,ताळेबंद,नफा-तोटा पत्रक पदकारी कायद्यानुसार व बँकेच्या उपविधीनुसार नफ्याची विभागणी२०२४-२५ लेखा परिक्षकाचा अहवाल,नविन लेखा परिक्षकाची नियुक्ती,सन २०२५-२६ च्या उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक वार्षिक् सभेस हजर नसलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीला मंजुरात देण्या बाबत प्रस्ताव, आमसभेने दिलेल्या मंजुरातीनुसार निर्लेखीत केलेल्या खात्याची नोंद घेण्याबाबतचा विषय, बँकेच्या उपविधीतील पोट नियमात रिझर्व्ह बँक व सहकार खात्यांनी सुचविलेल्या निर्देशानुसार दुरूस्ती करण्याच्या विषयास आमसभेची मंजुरात घेण्यात आली.बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा यांनी आभार मानले आमसभेला पंजाबराव देशमुख खडकेकर, साहेबराव ठेंगे,निखिल चिद्दरवार, निलेश पेन्शनवार,भीमराव कांबळे,दिपक जाधव, धर्मेद्र जळवगावकर,संजय लोंढे,परमेश्वर जयस्वाल,नायब भाई,अनिल चेंडकाळे, अखिलेश अग्रवाल,दिनकर गुल्हाणे,के.जी.चव्हाण, प्रकाश लामणे, दीपक हरिमकर,गणेश डंगोरीया,बँकेचे संचालक अॅड. आप्पाराव मैंद, के.आय.मिर्झा,ललित सेता,निळकंठ पाटील,विनायक डुब्बेवार,प्रवीर व्यवहारे,अविनाश अग्रवाल,सुनिल चव्हाण,रंजित सांबरे,सौ.राजश्री देशमुख,सौ.वंदना पाटील,ला उपस्थित होते.

 
नप सफाई कर्मचाऱ्यांची कैफियत यावेळी 
 पुसद न.प. सफाई व पेन्शन धारक कर्मचाऱ्यांनी वेळेवर प्रश्न उपस्थित करतांना मागील २५ वर्ष्यापासून त्यांचे पगाराचे खाते पुसद अर्बन बँकेत होते. मात्र आता स्टेट बँकेत का वळविन्यात आले ,कामगारांना स्टेट बँकेकडून तुच्छ वागणूक देण्यात येते असून कर्ज मंजूर होत नसल्याने लग्न, आजार, शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाची समस्या निर्माण झाल्याचा प्रश्न उपस्थित करून ही खाती पुन्हा पुसद अर्बन बँकेत सुरु करण्याची कळकळीची विनंती केली. यावर अध्यक्ष शरद मैंद यांनी सांगितले की सफाई कामगारांचे पगाराचे खाते हे पुसद अर्बन बँकेने स्टेट बँकेत वळविले नसून विधान सभेच्या निवडणुकी नंतर दि.२६ सप्टेंबर २०२५ या छयरोजी न.प. मुख्याधिका-यांनी जुन्या जी.आर.चा आधार घेत बँकेला तसे पत्र दिले.
मात्र यापूर्वी कोणत्याही मुख्य अधिकारी यांनी असे केले नाही व तुम्हाला पुसद जय   छछ छ या.   या पदावर येऊन ३ वर्ष झाले मग विधानसभा निवडणुक निकाला नंतर तिसऱ्याच दिवशी खाती वळती करण्यामागचे कारण काय असा प्रश्न बँकेचा अध्यक्ष म्हणून मी सी ओ ला केला ,तेव्हा त्यांनी हे खाते वळती करण्यासाठी स्थानिक राजकिय दडपण आल्याचे मुख्याधिकारी यांनी अपल्याला सांगितले असे शरद मैंद यांनी सांगितले. येत्या न. प. निवडणुकी नंतर नगर सेवकांनी ठराव केल्यास खाती पुसद अर्बन बँकेत येऊ शकतात असे शेवटी शरद मैंद म्हणाले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close