राजकिय

पुसद तालुक्यातील १२० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर; अनेकांचे गावातील पुढारी होण्याचं स्वप्न भंगले तर काहींचे रंगले.!

सरपंच पदाचे गाव निहाय आरक्षण जाणून घ्या…

पुसद: तालुक्यातील १२० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाल्याने अनेक गावांमधील मधिल मातब्बर नेते व गाव पुढारी याचा हिरमोड झाला आहे तर काहींचे स्वप्न भंगले… तर काहींचे स्वप्न रंगले … गावचा पुढारी होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गाव पुढाऱ्यांना मात्र या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही याची खात्री झाली असून उत्सुकता संपुष्टात आल्याने अनेक गाव पुढाऱ्याचा हिरमोड झाला आहे.

पुसद तालुक्यातील सरपंच पदासाठी १२० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज यशवंत रंगमंदिर येथील बचत भवनात काढण्यात आली असून तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी महादेव जोरवर तहसीलदार पुसद नायब तहसीलदार गणेश कदम दिलीप कोल्हेवाड तसेच तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शेख अहेमद व महसूल विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत हे आरक्षण सोडत काढण्यात आली.२०२५ ते २०३० या कालावधीसाठी तालुक्यातील १२० गावाच्या सरपंचाची आरक्षण सोडत आज यशवंत रंगमंदिर येथील बचत भवन येथे निश्चित करण्यात आली यावेळी तहसीलदार यांच्यासह महसूल व पंचायत समिती कर्मचाऱ्यासह आदी विविध गावातील सरपंच पदाचे इच्छुक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.२०२५ ते २०३० या कालावधीसाठी तालुक्यातील १२० गावाच्या सरपंचाची आज झालेल्या आरक्षण सोडती मध्ये अनुसूचित जतीसाठी१८ जागा राखीव असून त्यापैकी ९ जागा ह्या अनुसूचित जातीच्या महिला राखीव आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी २१ जागा राखीव असून त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या महिलासाठी ११ जागा राखीव आहेत, तर नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित २० जागा राखीव असून त्यापैकी १० जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत. खुल्या प्रवर्गातील ६१ गावांमध्ये खुला प्रवर्गासाठी असून त्यापैकी ३१ जागा खुला प्रवर्गातील महिलांसाठी आहेत असे एकूण १२० ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी कु. लक्ष्मी योगीराज जोगदंडे या मुलीच्या हस्ते ईश्वचिठ्ठी व्दारे काढण्यात आले.

या आरक्षण सोडतीवर अनेक गावातील गाव पुढारी लक्ष ठेवून होते. आरक्षण सोडती दरम्यान गावचा पुढारी होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इच्छुकांना व नेत्यांना मात्र या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही याची खात्री होताच अशा पुढार्‍याची उत्सुकता संपुष्टात आल्याने तसेच मनासारखे आरक्षण मिळाले नाही म्हणून आरक्षण सोडतीतून काढता पाय घेतला तर अनेक मातब्बर नेते व गाव पुढाऱ्यांचा हिरमोड झाला आहे तर काहींचे स्वप्न भंगले… तर काहींचे स्वप्न रंगले …

ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण माहे एप्रील २०२५ ते मार्च, २०३० सन २००५ ते २०२५ मधिल आरक्षण दर्शविणारा तक्ता….

१)अनसिंग-सर्वसाधारण महिला,

२)आडगाव-सर्वसाधारण,

३)आमटी- सर्वसाधारण महिला,

४) आरेगाव-सर्वसाधारण,

५)आसोली-सर्वसाधारण,

६)इंदीरानगर-ना मा.प्र महिला,

७)ईनापुर-अनु जमाती,

८)ईसापुर-ना.मा.प्र.

९)उडदी-ना.मा.प्र.

१०)काकडदाती-ना मा.प्र महिला,

११)काटखेडा- ना.मा.प्र.

१२)कारला-सर्वसाधारण,

१३ कान्होळ-सर्वसाधारण महिला,

१४)कुंभारी-अनु-जमाती,

१५)कृष्णनगर-अनु-जमाती महीला,

१६)कोंडई-अनु जमाती महिला,

१७)कोप्रा बु-अनु-जमाती महीला,

१८)खंडाळा- ना.मा.प्र.

१९)खडकदरी-अनु जमाती,

२०) खर्षी – सर्वसाधारण महिला,

२१)खैरखेडा-अनु-जमाती महीला,

२२)गहुली – सर्वसाधारण, 

२३)गाजीपुर – सर्वसाधारण महिला,

२४)गायमुख नगर – ना.मा.प्र. महिला,

२५)गोळ खु -अनु जमाती,

२६)गौळ बु – सर्वसाधारण,

२७)गौळमांजरी – ना.मा.प्र.

२८) घाटोडी -अनु जाती,

२९) चिचघाट – अनु जमाती महिला,

३०)चिकणी -सर्वसाधारण, 

३१)चोंढी – अनु. जाती,

३२) जगापूर- सर्वसाधारण,

३३) जुनुना -अनु. जाती महिला,

३४)जमनीधुंदी – सर्वसाधारण,

३५)जमशेटपुर – ना.मा.प्र. महिला,

३६) जवळा – सर्वसाधारण महिला,

३७)जवळी – अनु.जमाती महिला,

३८)जांबबाजार – सर्वसाधारण,

३९)जामनाईक- २ सर्वसाधारण,

४०)जामनाईक- १सर्वसाधारण महिला,

४१) ज्योतीनगर – सर्वसाधारण महिला,

४२) दगड धानोरा- सर्वसाधारण महिला,

४३) दहीवड बु -अनु जाती,

४४) दुधागीरी -सर्वसाधारण,

४५) देवठाणा -सर्वसाधारण, 

४६) धनकेश्वर – सर्वसाधारण महिला,

४८) धनसळ – सर्वसाधारण,

४९) धानोरा ई -सर्वसाधारण,

५०) नानंद ई – अनु जमाती,

५१)नानंद खुर्द – अनु जाती महिला,

५२)निंबी -सर्वसाधारण, 

५३)पन्हाळा -सर्वसाधारण महिला, 

५४) पांढुर्णा खु. – सर्वसाधारण,

५५) पांढुर्णा बु.-सर्वसाधारण महिला,

५६)पारवा -अनु जाती महिला, 

५७) पार्डी – ना.म.प्र. महिला,

५८) पिंपळखुटा – सर्वसाधारण महिला,

५९) पिंपळगाव ई- सर्वसाधारण महिला, 

६०) पिंपळगाव मु.- सर्वसाधारण महिला, 

६१) पोखरी -सर्वसाधारण, 

६२) फुलवाडी -सर्वसाधारण महिला, 

६३) फेट्रा – अनु जाती महिला,

६४) बान्सी -अनु जाती, 

६५) बिबी -अनु जमाती महिला, 

६६) बिबी -सर्वसाधारण, 

६७) बेलोरा बु -सर्वसाधारण, 

६८) बोरगडी – अनु जमाती महिला, 

६९) बोरी खु. – सर्वसाधारण महिला, 

७०) बोरी म -सर्वसाधारण, 

७१) ब्राह्मणगाव -अनु जाती महिला, 

७२) भंडारी-अनु जाती महिला, 

७३) भोजला-ना.म.प्र.महिला,

७४) मरसुळ – अनु जाती,

७५) मांजर जवळा- अनु जाती महिला,

७६) मांडवा – ना.म.प्र. 

७७) माणिकडोह – अनु जाती,

७८) मारवाडी खु. – सर्वसाधारण महिला,

७९) मारवाडी बु – सर्वसाधारण,

८०) माळ असोली – सर्वसाधारण, 

८१) मुंगशी – ना.म.प्र.महीला,

८२) मोखाड – अनु जमाती महिला,

८३) मोप -अनु जमाती महिला, 

८४) मोहा ई -अनु जमाती महिला,

८५) मैहशमाळ -सर्वसाधारण महिला, 

८६) येलदरी- अनु जाती,

८७) राजना -अनु जाती महिला, 

८८) रामपूर नगर – अनु जमाती महिला,

८९) रोहडा – अनु जमाती,

९०) लाखी – सर्वसाधारण,

९१) लोणदरी – अनु जमाती महिला,

९२) लोणी – सर्वसाधारण,

९३) लोहरा ई -सर्वसाधारण महिला, 

९४) वडगाव – अनु जमाती, 

९५) वडसद – सर्वसाधारण महिला,

९६) वनवारला – सर्वसाधारण 

९७) वरुड – ना.म.प्र.

९८) वसंतवाडी – सर्वसाधारण महिला,

९९) वालतुर तांबडे – सर्वसाधारण,

१००) वालतुर रे.-सर्वसाधारण महिला, 

१०१) वेणी खु- सर्वसाधारण महिला,

१०२) शिळोणा – सर्वसाधारण महिला,

१०३) शिवनी – सर्वसाधारण महिला,

१०४)शेबांळपिंप्री -सर्वसाधारण महिला, 

१०५) शेलू खु -सर्वसाधारण, 

१०६) शेलु बु. – सर्वसाधारण

१०७) श्रीरामपूर – ना.म.प्र. महिला,

१०८) सांडवा -सर्वसाधारण महिला,

१०९) सावंगी – ना.म.प्र.महीला,

११०) सावरगाव गोरे – ना.म.प्र.महीला

१११) सावरगाव बं – ना.म.प्र.

११२) सिंगर वाडी – ना.म.प्र.

११३) हनवतखेडा – अनु जमाती,

११४) हर्षी -अनु जाती, 

११५) हिवळणी पा.- ना.म.प्र.

११६) हिवळणी त. अनु जाती,

११७)हुडी बु.- सर्वसाधारण महिला,

११८) हुडी खु.-सर्वसाधारण महिला, 

११९) हेगडी – सर्वसाधारण महिला, 

१२०) होरकड – सर्वसाधारण,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close