राजकिय

पुसद शहरात चाललंय तरी काय? अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठी खिंडार! राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहराध्यक्षपदी डॉ.अकील मेमन यांची नियुक्ती!

पुसद : शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपुर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येथील प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ,जेष्ठ नेते व नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ.अकील मेमन यांनी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून नुकतीच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा पक्षप्रवेश अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपुर्वी राज्यमंत्री असलेले ॲड.इंद्रनील नाईक यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते पक्ष सोडून गेल्याने त्यांना जबरदस्त हादरा बसला आहे.त्यामुळे शहरातील राजकीय समीकरण बदलताना दिसून येत आहे. याबाबत सुत्रांनी झेप न्यूज दिलेली माहिती अशी की,पुसद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( शरदचंद्र पवार) पुसद शहर अध्यक्ष पदी येथील प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ,जेष्ठ नेते व माजी उपनगराध्यक्ष डॉ अकील मेमन यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशनुसार नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष श्रीमती वर्षाताई निकम यांनी पत्राद्वारे डॉ.अकील मेमन यांना नियुक्ती बद्धल कळविले आहे.पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारानूसार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात पक्ष बळकटीसाठीतसेच पक्षाचे ध्येय धोरण सर्व सामान्य पर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाच्या पुसद शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात येत असल्याचे पत्रात कळविले आहे.डॉ. मेमन हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पासून दीर्घ काळ पक्षाचे शहर अध्यक्ष होते.तसेच मागील सलग २० वर्ष ते पुसद नगर पालिकेत नगरसेवक व अनेक वर्ष उपाध्यक्ष राहिलेले आहेत.पण पुसद मतदारसंघाच्या राजकारणात नाईक घराणं हे अपराजित घराणं आहे.वसंतराव नाईक नंतर सुधाकरराव नाईक तसेच मनोहरराव नाईक राजकारनात सक्रीय असताना त्यांचे मुस्लिम समाजातील विश्वासु म्हणून डॉ.मेमन यांना समजले जायाचे परंतु २०१९ मध्ये मनोहरराव नाईक यांचे धाकटे पुत्र इंद्रनील नाईक आमदार झाले व पुढे राष्ट्रवादीत फुट पडल्याने ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून गेले व आमदार झाले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पासून नाईक घराणे शरदचंद्र पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते तर त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी सुद्धा एकनिष्ठ होते परंतु आता या पक्षात पडलेली फुट व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची होत असलेली दमछाक तसेच कामे होत नसल्याने आणि मनोहरराव नाईक यांच्या कार्यकाळात पदाधिकाऱ्यांना मानसन्मान मीळत होता तो मानसन्मान आता मीळत नसल्याने अनेक निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी दुर झाले आहेत तर काहीना ही पक्षात पडलेली फुट पटली नाही त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी नाईक घराण्यांपासून दुर जात असल्याचे चित्र आहे.त्यामुळे डॉ . मेमन हे सुद्धा नाईक घराण्यापासुन दुर गेले असुन ते राष्ट्रवादीच्या मुळ पक्ष शरदचंद्र पवार पक्षात असून पक्षानेही त्यांचावर पुन्हा मोठी जबाबदारी सोपवली असून त्यांचा हे अनुभव पक्ष वाढीसाठी महत्वाचा ठरेल असा विश्वास प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांनी व्यक्त केला.या नियुक्ती बद्धल डॉ.मेमन यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया ताई सुळे, जेष्ठ नेते अनिल देशमुख,आमदार रोहित पवार,पक्षाचे प्रदेश महासचिव शरद मैंद, जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम यांचे आभार व्यक्त करून पक्षाने दिलेल्या जबाबदारी ला प्रामाणिक पणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार अशी त्यांनी ग्वाही दिली.त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close