पुसद नगरपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्वबळावर लढणार-शरद मैंद महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस

पुसद : सध्या निवडणुकांचे वारेवाहू लागले पुढील महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगर परिषदेची निवडणुका होणार असल्याचे संकेत आहेत, या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुकांच्या भाऊगर्दीच्या हालचालींना वेग आला असल्याने महायुतीच्या घटक पक्षांना सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी आमच्या महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी आमच्याशी कोणताही संपर्क साधला नसल्यामुळे महविकास आघाडीची आघाडी हो-या- नां- हो तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुसद नगरपरिषदेसह जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूका स्वबळावर लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शरद मैद यांनी झेप न्यूज शी बोलतांना दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असुन येणाऱ्या ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुसद मतदारसंघात नगर परिषदेच्या तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकतीने लढणार आहेत महायुतीतील घटक पक्षांना नगरपरिषदेमध्ये सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या पक्षाची आघाडी झाली नसली तरीही नगरअध्यक्ष पदासह प्रत्येक प्रभागांमध्ये स्वातंत्र्य उमेदवार देऊन ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पूर्ण ताकतीने या निवडणुकीत उतरणार आहे. मागिल काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग आणि नंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून या निवडणुका रखडल्या होत्या मात्र नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे व प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे पुढील महिन्यांमध्ये आता या निवडणुका होतील असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती समोरा-सामोर उभे ठाकणार आहेत. महाविकास आघाडी व महायुतीतील घटक पक्ष या निवडणुकीला समोर जाण्यासाठी आपली ताकद लावत आहेत. नगरपरिषद या निवडणुकीमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून द्यावयचा आहे मागील पंधरा वर्षापासून या नगरपरिषदेवर महिलाराज होते. या निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे अनेक पक्षातील इच्छुकांनी नगराध्यक्ष पदासाठी दावेदारी सांगितली आहे. जर महाविकास आघाडीमध्ये आघाडी न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नगरपरिषदेची ही निवडणुक स्वबळावर लढणार असल्याने या पक्षाच्या वतीने निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. पुसद नगरपरिषदेत गेल्या याच महायुतीतील घटक पक्षांनी गेले एकत्र येण्यापूर्वी कित्येक वर्षापासून नगर परिषदेच्या सभागृहात राष्ट्रवादी शिवसेना सत्तेत तर भारतीय जनता पक्ष विरोधात असे काम पाहिले आहे. या महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या शहराच्या विकासाचा खेळखंडोबा केला असून या शहराला विकासापासून कोसो दूर ठेवले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शहरातील जनतेशी सामाजिक बांधिलकी जपून जनतेच्या हितासाठी या निवडणुकीत उतरण्याची पूर्ण तयारी केली आहे.पुसदचा विचार केल्यास पुसदमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची आमची मानसिकता आहे. परंतु महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी आजपर्यंत या विषयावर आमच्याशी कुठलाही संपर्क साधला नाही किंवा साधी चर्चाही केली नाही. त्यामुळे ज्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत सत्ता उपभोगली किंवा सत्तेचे फळे चाखले अशा सत्ताधारी महायुतीच्या या मित्र पक्षांना ज्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या शहराला जाणीवपूर्वक विकास पासून दूर ठेवले अशा पक्षातील पदाधिकाऱ्यांना या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या जाचांपासून पुसदकरांची सुटका करण्यासाठी चार पावलं मागे येऊन सर्वांचा मान सन्मान ठेवून महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. परंतु महाविकास आघाडीततील आमच्या सहकारी पक्षाने आमच्याशी संपर्क साधला नसल्यामुळे किंवा नगरपरिषदेच्या निवडणुकीबाबत साधी चर्चाही केली नसल्यामुळे आमची महाविकास आघाडी सोबत आघाडी न झाल्यास आमची स्वबळाची तयारी आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पूर्ण ताकदिने या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह प्रत्येक प्रभागांमध्ये उमेदवार देणार आहे. कारण कार्यकर्ते गेल्या काही वर्षापासून निवडणुकीची तयारी करीत आहेत. पुसद शहरातील सर्व जागा आम्ही मोठ्या जोमाने लढणार आहोत. परंतु महायुतीतील घटक पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनने जोमाने या निवडणुकीत पुनरागमन करून आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष बसवु व ही सत्ता काबीज करून या शहराचा चेहरा मोहरा बदलू विकासाभिमुख प्रशासन या शहरातील नागरिकांना न्याय देऊ असे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शरद मैंद हे झेप न्यूज मीडिया शी बोलताना म्हणाले.



