Uncategorizedराजकिय

पुसद मतदारसंघात शरद मैंद यांचा हायटेक प्रचार जोरात

पुसद : विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरद मैद यांचा हायटेक प्रचार पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. सोशल मीडियावरील प्रचारात शरद मैद यांनी आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे.योग्य नियोजन रिल्स, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून प्रचाराचा धुमधडाका जोरात सुरू आहे.

पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांची विधानसभेची ही पहिली निवडणुक आहे. पाच वेळा त्यांनी पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाची अविरोध निवड झाली असून मागील पाच टर्म पासून ते बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे. त्यांनी भारती मैंद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत या शहरात विविध सामाजिक कार्य करून सर्वसामान्य माणसांच्या मनावर समाजकार्याची छाप सोडली आहे. होवू घातलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे या मतदारसंघातून तिकिटासाठी मोठी लाईन असतांना सुद्धा त्यांनी तिथेही आपले वर्चस्व दाखवून उमेदवारी मिळवली व पक्षाकडून एबी फॉर्म मिळविला उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी त्यांनी पुसद शहरात भव्य रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणाबाजी करीत त्यांचे फोटो असलेले फलक झळकवले. त्यांच्या प्रचार रॅलीत स्थानिक मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून त्यांना समर्थन दिले.  निष्ठेचे पाईक… वसा सामाजिक कार्याचा..!  आधार आपुलकीचा..! ही टॅगलाईन घेऊन महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मित्रमंडळी शरद मैद यांच्या हायटेक प्रचारात जोरदारपणे उतरले आहेत. शरद मैद यांनी उमेदवारी दाखल करताच या मतदारसंघातील गावोगावी जाऊन प्रचार सभा घेत मतदार संघ पिंजून काढत आहे. तर एकीकडे सोशल मीडियावरील प्रचारात शरद मैद यांनी आघाडी घेतली आहे.योग्य नियोजन रिल्स, बॅनर पोस्टरच्या माध्यमातून प्रचाराचा धुमधडाका लावला असून या प्रचारात या मतदार संघात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.पुसद विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ॲड. इंद्रनील नाईक यांनी मागील पाच वर्ष सत्ता उपभोगली आहे तर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माधवराव वैद्य यांनी नव्यानेच राजकारणात पदार्पण केले आहे तरीही जातीचे समीकरण त्यांच्या पाठीशी उभे आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अश्विन जयस्वाल यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन मनसेकडून उमेदवारी मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा ची ताकद, सत्ता पक्षाच्या उमेदवारासोबत आहे.पंरतु मतदारसंघातील महायुतीतील भाजप व शिवसेना शिंदे गट या दोन प्रमुख पक्ष युती धर्म पाळत नसल्याने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड. इंद्रनील नाईक यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही… तर शरद मैंद यांना सामाजिक कार्याचा वसा आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली तरीही निवडणुकीच्या प्रचारात शरद मैद यांनी हायटेक प्रचार प्रणाली राबवून प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र प्रवास मिळत आहे.या निवडणुकीतील उमेदवाराचे चेहरे जुनेच असल्याने तरुणांचे वाढलेले मतदान या वेळी कुणाला कौल देणार हे पाहणे औत्सुकाचे ठरणार अशी चर्चा मतदारसंघात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close