क्राइम

पुसद शहर हादरवणारं! दुहेरी हात्याकांडातील आरोपी २४ तासात पोलिसांच्या जाळ्यात!

पुसद: शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ईटावावार्डात २० जुलै २०२३ मध्यरात्री साहा आरोपीने एकाच कुटुंबातील तीन सदस्यांवर प्राणघातक हल्ला चढवला होता त्यामध्ये दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला होता तर आरोपी हात्याकांड घडवून पसार झाले होते.या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले होते. सदर घटनेची फिर्याद मय्यताचे नातेवाईक व पुतण्या नयन केवटे वय १७वर्ष यांनी दिली की ,दि. १९ जुलै २०२३ रोजी रात्री अंदाजे १०.३० वा. चे दरम्यान फिर्यादी ही त्याचे वडील, भाऊ व वॉर्ड मधील इतर लोक असे गप्पा मारत असताना तेथे गणेश तोरकड आणि अवि चव्हाण यांनी येवून फिर्यादीशी किरकोळ वाद घातला व तेथून निघून गेले. त्यानंतर दि. २० जुलै २०२३ रोजी मध्यरात्रीच्या समोर अंदाजे ०१.०० वा ने दरम्यान तेथे १) पवन बाजीराव वाळके वय २३ वर्ष, २) निलेश दिपक थोरात वय २२ वर्ष, ३) गणेश संतोष तोरकड वय २१ वर्ष, ४) गोपाल शंकर कापसे वय २६ वर्ष ५) गणेश शंकर कापसे वय २४ वर्ष ६) अवि चव्हाण वय २२ वर्ष, सर्व रा. इटाळा वॉर्ड पुसद असे सर्वांनी मिळून संगणमत करून हातात चाकू व कोयने घेवून हनुमतयाचा मंदीर जवळ विटाळावाई पुसद येथे फिर्यादीचे घरासमोर येवून आगोदर झालेल्या किरकोळ वादावरून फिर्यादीसा काका राहुल केवट मुलत भाऊ कि केवटे व कायद यावर चालू व कोयत्याने सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी करून शेजारील मदतीला येत असल्याने तेथून पळून गेले. फिर्यादीचा काका राहूल केवटे, चुलत भाऊ किश केवट याना जास्त मार लागल्याने ते उपचारापुर्वीच मयत झाले व काका बन्टी केवटे गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले.शहर पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आप.क्रं. ४७६ / २०२३ कलम ३०२, ३०७ १४३, १४४ १४७, १४८, १४९२९४ भादवी कलम va) (2) अनुसमीत जाती आणि अनुसुचीत जमाती (अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ मधील ) नुसार गुन्हे दाखल करीत तपास सुरू केला. परंतु पोलिसांसमोर आरोपी पकडण्याचे आव्हान ठाकले होते.

सदर गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड साहेब, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब.. सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर साहेब यांनी पोलीस निरीक्षक साहेब उमेश बेसरकर यांना माहीती देवून सदर गुन्हयाचे तपास कामी पोलीस स्टेशनची ०३ पथके तयार करून रवाना करण्यात आली. सदर तपासा दरम्यान यातील आरोपी हे वाशीमच्या दिशेन टाटा एस टेम्पो न. एम.एच.२९/ टी.६५७३ ही मधून पळून गेल्याची माहीती पुसद डि.पी.पथकाला मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पो हवा प्राकूल इंगोले, पाना अविनाश राठोड, पी को आकाश बाभूळकर, पो. कॉ. शुध्दोधन भगत, पो.कॉ. वैजनाथ पवार असे त्यांचे मागे शोध कामी रवाना झाले. त्याप्रमाणे वाशीम येथे लोकेशन मिळाले त्याठिकाणी शोध घेवून मा. अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब व सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद पकंज अतुलकर साहेब यानी दिलेल्या सुचनेनुसार तपासाचा रोख हा मालेगाव मेहकर, जालना जुना हायवे या दिशेने सुरू केला असता मालेगाव येथे आरोपीची गाडी सी. टी. फुटेज मध्ये दिसून आल्याने त्याप्रमाणे सदर पथकाने तपास पुढे सुरू ठेवला. तपास करत असताना सदर आरोपी हे औरंगाबाद ते पुणे हायवे वरील लिंबे टोल नाका पास झाल्याची खात्रीलायक माहीती मिळाल्याने सदर पथकाने आरोपीचा पाठलाग सुरू करून अहमदनगर पोलीसाचे मदतीने सदर सर्व आरोपींना औरंगाबाद पुणे हायवे वरील नेवासा या ठिकाणावरून त्यांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या टाटा एस टेम्पो न एम. एम. २९/ टी. ६५७३ वाहनासह ताब्यात घेण्यात आले. व त्यानंतर पुसद शहर पोलीस स्टेशन येथील स.पो.नि केदार व डि.बी पथक हे आरोपीतांना पुसद येथे घेवून आज रोजी दाखल झाल्याने त्याना सदर गुन्ह्यात अटक केली असून सदर गुन्ह्यांचे तपास अधिकारी सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर साहेब यांनी सदर आरोपीना पुसद न्यायालयासमोर समोर हजर करून आरोपीची दि.२८जुलै२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेतली असून सदर गुन्ह्यांचा तपास सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद पकंज अतुलकर साहेब हे करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड साहेब, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर साहेब याचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक आदर्शसिंग सीनीने पुसद शहर पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, वसंतनगर पोलीस निरीक्षक प्रवीण नाचणकर, सहा पोलीस निरीक्षक गणेश इंगोले, सहा. पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार यांचे सुचना प्रमाणे डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोहा प्रफुल इंगोले, पी हवा गिरीश बेंद्रे पोना दिनेश सोंळके पोन मनोज कदम गो. ना. अविनाश राठोड पो को आकाश बाभुळकर पो. को शुध्दोधन भगत पो का तेजनाथ पवार यानी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close