ईतर

लोकनेते देवराव पाटील चोंढीकर स्मृती समारोह;मान्यवरांची आदरांजली

पुसद: स्थानिक श्री. शिवाजी शिक्षण संकुलाचे आधारवड, यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष, माजी आमदार तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे संस्थापक अध्यक्ष दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांचा ३७ वा स्मृतीदिन समारोह श्री. शिवाजी शिक्षण संकुलाच्या भव्य प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी सर्वप्रथम माजी मंत्री डॉ. एन. पी. हिराणी, आमदार निलय भाऊ नाईक, माजी आमदार विजयराव पाटील चोंढीकर, दीपकभाऊ आसेगावकर, प्राचार्य डाॅ. उत्तमराव रूद्रवार, ॲड. आशिष देशमुख, , शरद भाऊ मैंद, शिवाजीराव देशमुख सवनेकर ,अविनाश देशमुख, श्याम चव्हाण, डॉ. अमोल मालपाणी, सिराज हिराणी, महेश खडसे, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, के .बी. पाटील कान्हेकर ,नागोराव पाटील सारकिन्ही यांनी पूजन व दिपप्रज्वलन करून आदरांजली अर्पण केली.

यांच्या समवेत ॲड. रमेश पाटील, शंकरराव भेंडे, सुभाषराव देशमुख, साहेबराव पाटील चौधरी, अश्विनीताई अनिरुद्ध पाटील चोंढीकर,डाॅ. नाना फुके, योगाजी गवळी, वामनराव देशमुख ,जनार्दन ढवळे ,नागोराव पाटील, सदाशिव ठाकरे, बि.जी. राठोड, साहेबराव धबाले, सुभाषराव मुडाणकर, गजानन चौधरी पिंपळगाव, सुभाषराव पाटील चौधरी, डाॅ. शैलेन्द्र नवथळे, रंजीत आसोले , जनार्दन ढवळे, भगवानराव आसोले, लक्ष्मण पाचकोरे, सुधाकर ठाकरे, नागोराव कदम, रवींद्र महल्ले, नानाभाऊ ताटेवार, रमेश पाटील चौधरी, पंडितराव घाडगे, प्रदीप पाटील, सतीश पाटील, संजय सुरेकर, किरण ठाकरे, ॲड. प्रशांत ठाकरे, नितीन सुभाषराव चौधरी, नितीन रमेशराव चौधरी, सदाशिव चौधरी, महेश चौधरी, अंकुश पाटील, गुलाबराव हाके ,बोडके भाऊ ,देविदास ठाकरे, किशोर ठाकरे ,किरण देशमुख सवणेकर, वैभव ठाकरे , जेष्ठ पत्रकार अखिलेश अग्रवाल, अनिल चेंडकाळे, दीपक महाडिक, प्रकाश लामने, रवी देशपांडे, कुलदीप सुरोशे, स्वप्निल माहुरे यांनी आदरांजली अर्पण केली. यांसह श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध शाखेतील माजी प्राचार्य तथा मुख्याध्यापक नामदेवराव फाटे, जामगडे सर, डी.पी. देशमुख सुधाकर लकडे, आर. एफ. शेख ,हरीश पाचकोरे, प्रताप सुर्यवंशी, पंचमसिह चव्हाण, पंजाबराव सुरोशे, पी.के.सावदे, प्रा.गणेशराव रावते, सुखदेवराव भगत, राजेंद्र रोकडे, शाहूराज काकडे, सदाशिव पठाडे ,ल.पू. कांबळे, ए.के. देशमुख, दिपक महल्ले, प्रा. विलासराव चव्हाण, प्राचार्य विजय उंचेकर, प्राचार्य लक्ष्मण वानखेडे, प्राचार्य शेख अरशद प्राचार्य एम .एन. ठाकरे, प्राचार्य पंडितराव मस्के, प्राचार्य शेख बिजान, मुख्याध्यापक सुनील गोंडे प्राचार्य वसंतराव धनवे, प्राचार्य थोरकर, प्राचार्य पेंटेवाड, प्राचार्य ठेंगे सर त्याचबरोबर श्री. शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्री शिवाजी अध्यापक विद्यालय, गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल व संस्थेच्या सर्व शाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, रा.से.यो. व एन.सी.सी. चे विद्यार्थी तसेच पुष्पावंती परिसरातील देवराव पाटील चोंढीकर याच्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक यांनी आपली आदरांजली अर्पण केली.

   .बहारदार संगीताच्या साथीने संगीत शिक्षक सारंग कोरटकर, नारायण हनवते ,प्रांजली देशमुख यांसह विद्यार्थिनींनी वैविध्यपूर्ण गितांमधून आदरांजली अर्पण केली. स्मृती समारोह कार्यक्रमाचे संचालन प्रा.गणेशराव रावते व प्रा.गजानन जाधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close