क्राइम

काळी दौ.वनविभागाचा कारभार चव्हाट्यावर एकाच कामाचं दोनदा काढली बिले तर अवैधरित्या खैर वृक्षांची खुलेआम तोड!

पुसद उपवन संरक्षक कार्यालयासमोर चौकशीच्या मागणीसाठी तक्रारकर्त्याचे उपोषण सुरू

पुसद :उपवनसंरक्षक कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रांत येतअसलेल्या काळी (दौ) प्रादे. कार्यालया अंतर्गत येत असलेल्या वनविभागाचा कारभार चव्हाट्यावर आला असून वणीकरणाच्या नावाखाली एकाच कामाचं दोनवेळा बिले काढली तसेच काळी रेंज मध्ये जवळपास ५०घनमीटर खैर जातीच्या वृक्षांची खुलेआम अवैधरित्या तोड करण्यात आली असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपवनसंरक्षक कार्यालयाच्या समोर दोन्ही मुद्द्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी दोन उपोषण मंडप उभारण्यात आले आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की,उपवनसंरक्षक कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रांत येतअसलेल्या काळी (दौ) प्रादे. कार्यालया अंतर्गत येत असलेल्या काळी रेंज मध्ये अवैधरित्या खैर जातीच्या वृक्षांची खुलेआम तोड करण्यात आली असून उपवनसंरक्षक पुसद व साह्यक वनसंरक्षक जकास कॅम्पा पुसद हे अवैध वृक्षतोड करणाऱ्या तस्करांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यानी दि.१८मार्च पासून उपोषण मंडपातून केला आहे.तर एकीकडे वडद येथे मार्च २०२३ मध्ये कक्ष क्रमांक ३४६ मध्ये २० क्षेत्र हेक्टर मध्ये मोठ्या प्रमाणात वनीकरणच्या कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली. तत्कालीन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर कामाचा खर्च करण्याकरिता धनादेश क्रमांक ८३६२८४ दि. ३१-३-२०२३ नुसार १२२४३६/रुपये व ११९२६९ रुपये ही रक्कम प्राप्त झाल्यानुसार मार्च २०२३ मध्ये तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल, वनरक्षक त्यांच्या खास मर्जीतील मजूर पुंडलिक आनंदा डवरे व इतर १६ मजूर सर्व राहणार बोरी यांनी दि. १० मार्च २०२३ ते २६ मार्च २०२३ पर्यंत काम केल्याचे दाखविण्यात आले. तसेच पुन्हा याच महिन्यात सुनील परसराम भिसे व९ मजूर सर्व रा. वडद यांनी दि. १५ मार्च २०२३ ते ३० मार्च २०२३ पर्यंत वरील मजुरांनी काम केल्याचे दाखवुन मोठ्या प्रमाणात क्रमांक २५२ मार्च २०२३ च्या प्रमाणका नुसार वरील मजुरांनी कामे न करता त्यांच्या वेगवेगळ्या बैंक खात्यात मजुरीची रक्कम टाकून त्यांना यातील काही रक्कम बैंक खातेदारास देऊन बाकी रक्कम परंत घेऊन तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक सर्व काळी रेंजचे व त्या वेळचे एसीएफ त्यांच्या संगणमताने हडप केल्याचा आरोप तक्रारदार व उपोषणकर्ते विनायक दौलतराव गुजर यांनी केला आहे तर या गैर कारभाराची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याकरिता त्यांनी १७ डिसेंबर पासून शासकीय वेळेमध्ये पुसद उपवनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण थाटले आहे. तेव्हा तत्कालीन जे जे अधिकारी लिपिक कर्मचारी या घोटाळ्यामध्ये सहभागी असतील त्यांची समिती नेमून सखोल चौकशी करण्यात यावी या आशयाची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close