प्रा. गजानन वायकुळे बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्डने सन्मानित;मुंबई येथे किरण बेदी व सायना नेहवाल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पुसद : येथील को.दौ. विद्यालय व गो.मु. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन रंगराव वायकोळे यांना मुंबई येथे सायन्स ओलंपियाड कडून पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी व पदमभूषण ऑलम्पिक मेडल विजेती सायना नेहवाल यांच्या हस्ते बेस्ट प्रिन्सिपल म्हणून सत्कार करण्यात आला.इंडियन सायन्स ओलंपियाड या संस्थेमार्फत संपूर्ण देशातून सुमारे दीड लाख शाळांचे सर्वेक्षण करून महाराष्ट्रातील सुमारे १००० शाळांची निवड करण्यात आली त्यातील सुमारे १५० शाळेतील प्राचार्यांचा मुंबई येथे दिनांक १८ मार्च रोजी रिचमनन अपारटमेंट हिरानंदानी गार्डन,पवई येथे भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.
प्रा. गजानन वायकुळे यांना पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी व पदमभूषण ऑलम्पिक मेडल विजेती बॅडमिंटन पटू साईना नेहवाल यांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल व रुपये पाच हजार व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. गजानन वायकुळे हे आपल्या यशाची श्रेय शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना देतात



