श्री.कम्प्युटर व एमकेसीएलच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण व शिक्षकांचा सत्कार!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-संगणक या युगातील फार महत्त्वाचा घटक बनला आहे कॉम्पुटर साक्षरता अविभाज्य घटक बनला आहे ई-मेल, सोशल मीडिया, यासारख्या गोष्टीचा वापर करून आपण माहिती देवाण-घेवाण करतो संपर्क करतो ज्या गोष्टी सहजासहजी शक्य नाही त्या गोष्टी आपण संगणकाच्या माध्यमातून करतो हे तंत्रज्ञानाचे युग आहे
.
त्यामुळे संगणकाचे ज्ञान आवश्यक बनले आहे या अनुषंगाने हिवरा संगम येथील शासनमान्य श्री. कॉम्पुटर व एमकेसीएलच्या वतीने येथील एच.ई.एस. विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली यामध्ये एकूण ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला शिक्षक दिनाच्या निमित्ताने या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रथम क्रमांक योगेश्वरी दत्ता राठोड व उमेश राठोड, द्वितीय क्रमांक अस्फिया बेग, तिसरे बक्षीस वेदिका पाटील यांना देण्यात आले तर स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एमकेसीएल तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.
तसेच शिक्षक तथा मुख्याध्यापक बालाजी घाडगे, पर्यवेक्षक विलासराव भुसारे, यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार म्हणून प्रमाणपत्र भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी शिक्षक विजय कदम सर, श्याम बोरोड, सोनटक्के सर,वांगे मॅडम, ठाकूर मॅडम, करपुडे सरउपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री कॉम्प्युटरच्या संचालिका सौ. श्रद्धा ठाकरे यांनी केले.



