पुसद पोलीस उपविभागातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचा उच्छाद; तक्रारकर्त्याची तक्रार घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ!

पुसद: पोलीस उपविभागातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शहर पोलीस स्टेशन, वसंत नगर पोलीस स्टेशन, पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन, खंडाळा पोलीस स्टेशन, या चारही पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. तसेच या अवैध धंदेचालकांची परिसरात दहशतदेखील आहे.एखादा नागरिक तक्रारकरण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला की त्याला पोलीस दबंगगिरी करीत उडवाउडवीचे उत्तर दिले जाते कींवा त्याला जाणीवपूर्वक तासनतास तात्काळत बसविले जाते त्यामुळे या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे सुरू असल्याची गोपीनीय खबर नेहमी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकांना असते परंतु ज्या पोलीस स्टेशनच्या बुडाखाली हे अवैध धंदे सुरू आसतात ते पोलीस मात्र अनभिज्ञ असतात त्यामुळे हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी आता थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे..याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद पोलीस उपविभागाच्या हद्दीतील शहर पोलीस स्टेशन, वसंत नगर पोलीस स्टेशन, पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन, खंडाळा पोलीस स्टेशन, या चार पोलीस स्टेशन आहेत परंतु या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवर वरीष्ठ अधिकाऱ्याचे नियंत्रण नसल्याने या पोलीस कर्मचाऱ्यांची मनमानी कारभार सुरू आहे. पोलिसांकडून ब्रीदवाक्य असलेल्या ”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” बोधवाक्याचा विसर पडला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.एखादा नागरिकांना तक्रार देण्यास पोलीस स्टेशनमध्ये गेला असता त्याची तक्रार पहिले तर दबंगगिरी करून टाळाटाळ केली जात कींवा त्याला तासनतास तात्काळत बसविले जाते कींवा तक्रार न घेता तडजोड करण्याचा व प्रकरण मिटविण्याचा पोलिसांकडून सल्ला दिला जातो.त्यामुळे तक्रारकर्त्याचे मनोबल खचविले जाते असा प्रकार पोलीस उपविभागातील चारही पोलीस स्टेशनमध्ये सर्रासपणे सुरू आहे. सकाळच्या वेळेस चक्क पोलीस स्टेशनचे दरवाजे बंद करण्यात येतात तर ग्रामीण पोलीस स्टेशन, वसंत नगर पोलीस स्टेशनला कोणी वालीच नाही. खंडाळा पोलीस स्टेशन मध्ये जास्तिजास्त कर्मचारी तालुक्यातील ठिकाणांहून ये-जा करत असल्याने तिथे नेहमी कर्मचाऱ्यांची वानवा जाणवत असून एक किंवा दोन कर्मचाऱ्यावरच ४२ गावांचा कारभार पाहिला जातो. पुसद परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदारांनी तक्रार केल्यास ती तक्रार घेतल्या जात नाही डायरीमध्ये नोंद करण्यासाठी साहेबांना येऊ द्या अशी भाषा कर्मचारी सतत करत राहतात साहेब कुठे मिटींगला गेले तर तक्रारदाराला तासंनतास ताटकळत उभे ठेवण्यात येते किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बोलावण्यात येते. शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अतिशय ढासळली असून अवैध वाहतुकीने कळस गाठला आहे. गुटखा व अमली पदार्थ खुले आम विकले जात असून मटका जुगार सर्रासपणे सर्वत्र चालू आहे. शहरात अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे असून मोबाईलवरच मटका घेणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. संपूर्ण तालुक्यालाच अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे.ग्रामीणभागात गावोगावी हातभट्टीचा महापूर वाहत आहे. शहरातील तसेच तालुक्यातील वाहतूक व्यवस्था अतिशय विस्कळीत झाली असून रोड रोमींओंच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मागील चार-पाच दिवसाआधी वाहतूक शाखेने दंडात्मक केलेली कारवाई वगळता आत्तापर्यंत वाहनधारकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नव्हती त्यामुळे अवैध वाहतूक, अनियंत्रित वाहतूक, जागोजागी गाड्यांमुळे रस्ते अडवणे असे प्रकार सतत होतच आहेत. पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर प्रचंड प्रमाणात मटका व जुगार चालू असून गुटखा विकणारे ही याच परिसरात सक्रिय आहेत. पुसद शहराला संवेदनशील शहर म्हणून केवळ डाग लागलेला असून याचीच सहानुभूती हे अधिकारी कर्मचारी घेतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष तिकडेच केंद्रित करतात त्यामुळे त्यांचे अवैध धंद्ये खुलेआम चालू असून या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. शहर व तालुक्यातील दुचाकी चोरीला जाणे, मोबाईल चोरीला जाणे, घर फोडी, मारामारी अशा प्रकारचे गुन्हे सतत वाढत आहेत. हे अवैध धंद्ये या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुरू असल्याची गोपीनीय खबर नेहमी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकांना असते परंतु ज्या पोलीस स्टेशनच्या बुडाखाली हे अवैध धंदे सुरू आसतात ते पोलीस मात्र अनभिज्ञ असतात त्यामुळे हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी आता थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे..



