राजकिय

आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा : हंसराज अहिर यांचे भाजपच्या पुसद जिल्हा अधिवेशनात प्रतिपादन! 

पुसदः नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले असुन मागील दहा वर्षात लोकाभिमुख योजना भाजप सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आला आहे. त्या जोरावर २०२४ च्या निवडणुकीत भारतीय जनतापक्षाने पुन्हा सत्तेत आला असून पुढील काळात महाराष्ट्रात विधानसभा, जिल्हा परिषद नगरपालिका या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी पक्षाचे संघटन वाढून पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांनी सज्ज व्हावे असे प्रतिपादन हंसराज अहिर यांनी पुसद जिल्हा अधिवेशनात केले आहे.

दि. २ ऑगस्ट २०२४रोजी पुसद जिल्हा भाजपाचे अधिवेशन येथील अग्रवाल मंगल कार्यालयात संपन्न झाले. या अधिवेशनाला प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन उपेंद्रजी कोठेकर संघटन मंत्री भाजपा विदर्भ प्रदेश, उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने, विधान परिषदेचे माजी आमदार ॲड. निलय नाईक, राजेंद्र नजरधने व उत्तमराव इंगळे तसेच जिल्हा अध्यक्ष महादेवराव सुपारे, भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद जिल्हेवार, डॉ. आरतीताई फुपाटे उपाध्यक्षा अनु. जमाती महाराष्ट्र प्रदेश, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिरुध्द पाटील चोंढीकर, इरफान कुंदन, ॲड. आदित्य माने, बळवंतराव नाईक, निखिल चिद्दरवार, महेश नाईक, संतोष आर्य, महेश काळेश्वर, निळकंठ पाटील, ॲड. विश्वास भवरे, राजेंद्र डांगे, रवि ग्यानचंदानी, सुरज डुब्बेवार, एस. वाय. देशमुख, दीपक परिहार, पंजाबराव भोयर, शेखर वानखेडे, ॲड. अमेय नाईक अदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपाचे माजी आमदार राजेंद्र पाटनी यांचे निधन झाल्याने पंजाब सुरोशे यांनी शोकप्रस्ताव सादर केला. जिल्हा अध्यक्ष महादेवराव सुपारे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुक महायुती एकत्रपणे निवडणूक लढणार असुन पक्षाला घवघवीत यश मिळावे म्हणुन पदाधिकाऱ्यांनी कठोर मेहनत घ्यावी. संघटनेचे काम करतांना लोकापर्यंत ज्या योजनांचा लाभ सर्व सामान्य पर्यंत पोहोचविण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून करावे. केंद्र सरकार व राज्य सरकारने अनेक योजना गरिबांसाठी राबविल्या. परंतु ४ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांना ही प्रगती सहन होत नाही. केवळ देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टिका करण्याचे काम ते सतत करीत असतात. परंतु देवेंद्रजी फडणवीस हे शरद पवार, उध्दव ठाकरे व नाना पटोले यांना पुरुन उरणारे भाजपाचे नेते आहेत. सध्या विरोधाकडून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. सोशल मिडीया स्ट्राँग करा. लाडकी बहिण योजना घरोघरी पोहचवा असे ते म्हणाले. याप्रसंगी दोन राजकीय प्रस्ताव मांडण्यात आले.त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन व लाडकी बहिण योजना लागू केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन या दोन प्रस्तावावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

 

ॲड. निलय नाईक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात खूप परिश्रम घेवून जलकल्याणाच्या योजना राबविल्या. त्यामुळे भाजपाला तिसऱ्यांदा यश मिळाले आहे. नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान असावा ही गौरवाची बाब असल्याचे माजी आ.ॲड. निलय नाईक यांनी अभिनंदनाच्या ठरावावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून अनेक निर्णय त्यांनी घेतले. महिला भगिनींसाठी अनेक योजरा राबविल्या. १० कोटी ३३ लाख लोकांना गॅस व घरे दिली. जनधन योजना राबविली.गरिबांच्या कल्याणासाठी मोफत धान्य देण्यात आले. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यात आला आहे. शेतकरी समृध्द झाला पाहिजे यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. मुद्रा योजनामधून ४० कोटी कर्ज देण्यात आले. जलजीवन मिशन राबविण्यात आले. आरोग्यासाठी सवलत देण्यात आली. खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास हे खऱ्या अर्थाने त्यांनी राबविले. त्यांच्या नेतृत्वात भाजपा वाढत आहे असे सागुन ॲड. निलय नाईक म्हणाले, देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतांना समृध्दी महामार्ग तयार करण्यात आला. त्यामुळे या भागाचा विकास होत आहे.शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ करण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी केंद्र शासनाने निर्णय घ्यावा. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे असे आवाहन याप्रसंगी केले. माजी आ. राजेंद्र नजरधने यांनी ठरावाला अनुमोदन देवून नविन मतदार नोंदणी कार्यकर्त्यांनी करुन घ्यावी असे सांगुन ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले. आयुष्यमान भारत योजना प्रभावीपणे राबविली. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजना राबवुन महिलांना न्याय दिला आहे असे शेवटी ते म्हणाले.आ. नामदेव ससाने : लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाने गैरसमज पसरवून मतांची विभागणी केली. विचारांची लढाई या पुढे करावी. येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद व नगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी नवमतदार नोंदणी करुन घ्यावी. प्रत्येक विधानसभा मतदार संघात किमान १५ हजार नविन मतदार नोंदवावे. त्यामुळे भाजपाचा विजय कोणीही रोखणार नाही असे प्रतिपादन आ. नामदेव ससाने यांनी केले. ते म्हणाले, ३० ऑगस्ट पर्यंत नविन मतदारांची नोंदणी करता येईल त्यासाठी प्रयत्न करा. जवळचे मतदान केंद्र मिळण्यासाठी प्रयत्न करा. विधानसभा निवडणुकीत पुर्ण ताकदीनिशी भाजपाच्या पाठीशी राहून फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करा असे आ. नामदेव ससाने म्हणाले.उपेंद्रजी कोठेकर : याप्रसंगी उपेंद्रजी कोठेकर संघटनमंत्री भाजपा विदर्भ प्रदेश यांनी अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आज याठिकाणी जे अधिवेशन होत आहे ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. येणाऱ्या विधानसभा निवडणूक ही अतिशय महत्वाची असुन ही निवडणूक कलाटणी देणारी ठरेल. विरोधकांकडे लक्ष न देता महायुती येत्या विधानसभेत विजयी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असे उपेंद्रजी कोठेकर यांनी आवाहन केले. ते पुढे म्हणाले, विरोधक खोटे बोलतात. मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात विदेशात सुध्दा मान उंचावण्याचे काम केले. त्यांच्या कार्यकाळात देशाचा विकास झाला हे अधोरेखित करता येणार नाही. लोकसभा निवडणूकीत विरोधकांनी भाजपा सत्तेत आली तर घटना बदलेल असा अपप्रचार केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटना बदलणार नाही हे त्यांच्या कृतीवरुन दाखवून दिले. विविध विकास योजना राबवुन देश समृध्द केला. गोरगरिबांसाठी मोफत धान्य योजना सुरु केली. दहा वर्षात राष्ट्रीय महामार्ग वाढले. समृध्दी महामार्गामुळे या भागाचा कायापालट झाला. राज्य शासनाने लाडकी बहिण योजना राबविली आहे. त्यासाठी जनजागृती निर्माण करा. विरोधक खोटा प्रचार करुन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. शांतता बिघडविण्याचे ते काम करु लागले आहेत. त्यासाठी विधानसभा निवडणुकीत पुर्ण शक्तीनिशी उतरा. नविन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करा. ज्यांना १८ वर्षे पूर्ण झाले आहे त्या तरुणांचे नाव मतदार यादीमध्ये नाव कसे येईल ते पहा असे शेवटी ते म्हणाले.हंसराज अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आपल्या भाषणामध्ये कार्यकत्यांनी सजग राहिले पाहिजे असे सांगितले. यश कसे मिळेल याकडे लक्ष द्या. लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपा हरला असे वातावरण विरोधकांनी तयार केले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएला बहुमत मिळाले. काँग्रेसला शंभरीही गाठता आली नाही. महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आहे. ही युती विधानसभेमध्ये एकत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणार आहे. घटक पक्षाचे व भाजपाचे ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. मागील ७० वर्षात काँग्रेसने देशाच्या हितासाठी निर्णय घेतले नाही. त्यामुळे त्यांना सत्ता गमवावी लागली. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला. खताचे भाव जैसे थे ठेवले. ३७० कलम हटवून देश एकसंघ ठेवण्याचे काम त्यांनी केले. जम्मू काश्मीर सुध्दा आता सुरक्षित आहे असे सांगुन त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ते म्हणाले की, सैन्य मजबूत असेल सेनापती निवडणूक जिंकणार त्यासाठी प्रयत्न करा. येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद व नगर पालिका निवडणुकीसाठी जागृत व्हा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन विक्रांत जिल्हेवार व ओमप्रकाश शिंदे यांनी केले तर आभार ॲड. विश्वास भवरे यांनी मानले. या अधिवेशनाला तिन्ही विधानसभा मतदार संघातील भाजपाचे पदाधिकारी वकार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close