क्राइम

पोफाळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न! आरोपी ताब्यात घेवुन खुनाचा गुन्हा केला उघड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कामगिरी!

पुसद : पोफळी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि. १९ ऑक्टोंबर २०२५ रोजी रात्री ११/०० वाजण्याच्या सुमारास देवराव ग्यानबा वाळके वय ४५ वर्षे रा. धनज ता.उमरखेड जि. यवतमाळ हे मौजा वडद शेत शिवारामध्ये बाजीवर मृर्त अवस्थेत आढळून आला होता त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असता व प्रथम दर्शनीय पाहिले असता त्याच्या डोक्यावर झालेली दुखापत ती कोणत्यातरी अज्ञाताने धारदार हत्याराने करून जीवे ठार मारले असावे असे आढळून आले होते परंतु सदर घटनेचा पोफळी पोलीस स्टेशन येथे मर्ग गुन्हा आप. क्रं. २१०/२०२५ भा. न्या.सं. कलम १०३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.सदरचा गुन्हा घडताच   वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट देवुन स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकाला व पोफळी पो. स्टे. पोलिसांना हा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता सुचना केल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घडलेल्या घटने बाबत गावात तसेच आजूबाजूच्या लोकांकडे माहिती गोपीनिय पद्धतीने घेणे सुरू केले गुन्ह्याच्या ठिकाणीची माहिती जमा करून परिस्थितीची बारकाईने पाहणी केली असता मृर्तकास आरोपी किशन सोनबा वाळके रा. धनज याने जीवे ठार मारले असल्याबाबत गोपीनिय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन सदर मर्ग गुन्ह्मयातील   मृर्तकास झालेल्या दुखापती बाबत पोलीस कौशल्याचा वापर करून आरोपीस विश्वासात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच विचारपूस केली असता त्यांनी तात्काळ पोपटासारखे बोलण्यास सुरुवात केली व  मृर्तकास जीवाने ठार मारल्याचे आरोपीने कबूल केले अशा प्रकारे हा खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलिसांनी उघडकीस आणला. व आरोपी किसन सोनबा वाळके वय ४५ वर्षे रा. धनज ता.उमरखेड जि.यवतमाळ यास दि.२२ ऑक्टोंबर२०२५ रोजी पोफळी पोलीस स्टेशन अटक करून मर्ग क्रमांक २६/२५ कलम १९४ बिएनएसएस मधील मृतक याचे मारेकरी निष्पन्न करण्यात आला. अशाप्रकारे गुन्हा उघडकीस आणला. सदरची कारवाई ही कुमार चिंता, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ, अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ,हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, सतीश चवरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ त्यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून या कार्यवाही मध्ये स्थागुशा यवतमाळ कॅम्प पुसद व उमरखेड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close