जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल; पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद:येथील नगरपरीषदचे मुख्य अभियंता गिरीश सुधाकर डुबेवार रा. वासवी ले-आउट पुसद यांच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून फिर्यादी अनिल गोविंदराव तगडपलेवार रा. चौबारा चौक पुसद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी कलम ५०४, ५०६ भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार दि. २१ जूनच्या दुपारी २.३० वाजताच्या सुमारास येथील तहसील परिसरात फिर्यादी ची भेट गिरीश डुबेवार यांची झाली व या ठिकाणी फिर्यादीने त्याच्या प्लॉटचे विभाजन झाले कां? म्हणून विचारणा केली असता मुख्यअभियंता गिरीश डुबेवार यांनी फिर्यादी सोबत वाद करून शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार दाखल केली फिर्यादीच्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.



