Uncategorized

पोदार स्कूल, पुसदचा इतिहासनिर्माण करणारा पराक्रम;२४ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्यपदकासह विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नेपाळकडे भरारी

पुसद  : “विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडाक्षेत्रातही आपले वर्चस्व सिद्ध केले पाहिजे,” या ब्रीदवाक्याला साजेशी कामगिरी करत विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूल, पुसद येथील विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यशाची नोंद केली आहे.दि. असोसिएशन फॉर ट्रॅडिशनल यूथ गेम्स अँड स्पोर्ट्स इंटरनॅशनल आणि भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे झालेल्या ९व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तब्बल २४ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य पदके पटकावून राष्ट्रीय स्तरावर धडक दिली. यामुळे या विद्यार्थ्यांना नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळाली असून, हा पुसदसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, तायक्वांडो, अ‍ॅथलेटिक्स, लॉंग जंप अशा विविध खेळांत पोदारच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारात १४ वर्षाखालील गटात — कश्यप विनोद मनवर, अंश सुमित राठोड, आर्यन संतोष मारकड, सोहम प्रशांत पांडे यांनी सुवर्णपदक पटकाविले.१७ वर्षाखालील गटात — आदित्य पवार, वरद शिंदे, सुयश कानडे, पार्थ चव्हाण, नित्यम बावणे, नमन जांभरूनकर, देव राठोड, साईराम करे, दिव्यम दळवी, आविष्कार गरड, जय भोसले आणि आरुष भोपी यांनी सुवर्णपदक मिळवले. बॅडमिंटनमध्ये १४ वर्षाखालील गटात — रोहन चौधरी (सिंगल्स) यांनी सुवर्णपदक जिंकले, तर शशांक टिकार व मयंक राठोड (डबल्स) यांनी सुवर्णपदक पटकावले.१७ वर्षाखालील गटात — राहुल चौधरी यांनी सुवर्णपदक मिळवले. तायक्वांडोमध्ये १४ वर्षाखालील गटात — अनुष्का गावंडे, ताश्वी खोब्रागडे व उत्कर्ष पुसांडे यांनी सुवर्णपदके मिळवली.१७ वर्षाखालील गटात — सुशांत आढाव व वरद शिंदे यांनी सुवर्णपदक पटकावले.अ‍ॅथलेटिक्समध्ये समर्थ मारकड व नैतिक पोपळघाट यांनी १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.लाँग जंपमध्ये जय कांबळे यांनी सुवर्णपदक पटकावले.याशिवाय शाळेचे क्रीडाशिक्षक सुधाकर लिंबाजी खराटे यांना “बेस्ट कोच” म्हणून गौरविण्यात आले.या भव्य यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष  शरद मैंद, सचिव  सुरज डुबेवार, उपाधक्ष संतोष अग्रवाल, कोषाधक्ष मनीष अनंतवार आणि सहसचिव  संगमनाथ सोमावार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राधा धागमवार यांनी सर्व विजेत्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि म्हटले की, “हे यश आमच्या विद्यार्थ्यांच्या कष्ट, शिस्त आणि चिकाटीचे फलित आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close