ईतर

छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त नियोजन बैठक संपन्न!

पुसद :येथील छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती द्वारा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३दिवसीय शिवपर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवपर्वात दररोज सायंकाळी ७ते १० वाजे दरम्यान शेषराव पाटील जिनींग प्रेसिंग च्या प्रांगणात ख्यातनाम वक्त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांची मेजवानी शिवभक्तांना
मिळणार आहे. पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जेष्ठ विधिज्ञ माधवराव माने यांचे अध्यक्षतेखाली काल झालेल्या शिवजयंती नियोजनपूर्व बैठकी मध्ये विविध सूचना आल्या. त्यांना डोळ्यासमोर ठेऊन पुढील कार्यक्रमांची प्राथमिक रूपरेषा ठरली. सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहण्यात आली.

प्रास्ताविकात शरद मैंद यांनी यंदाच्या शिवपर्व साठी ख्यातनाम व्याख्यातांना आमंत्रित करण्याचा मानस बोलून दाखविला.तसेच भारती मैंद पतसंस्था च्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत पुसद तालुक्यातील विदयार्थ्यांसाठी उपक्रमशील शिक्षक चंद्रकांत ठेंगे यांच्या नेतृत्वात २फेब्रुवारी रोजी शिव सामान्य ज्ञान स्पर्धा,नितीन पवार यांच्या नेतृत्वात १५ते १७फेब्रुवारी शिवपर्व होणार असून त्यापैकी २दिवस व्यख्यान तर १दिवस शालेय विद्यार्थ्यांसाठी शिव पराक्रम गाथाचे आयोजन केले आहे. १८फेब्रुवारी रोजी रात्री १२वाजता जिजाऊ ब्रिगेडच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिव जन्मोत्सव साजरा होईल.सकाळी ८.३० वाजता शिवपुजन, सकाळी १०वाजता वैभव फुके यांच्या नेतृत्वात मोटार सायकल रॅली, दुपारी २ वाजता प्रा. अजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वात डीजे विरहित पारंपरिक वाद्य, नृत्य व कवायदचा सहभाग असलेली भव्य शोभयात्रा निघणार आहे.यावेळी डॉ मोहम्मद नदीम,दिगंबर जगताप तसेच एड. माधवराव माने यांनी मार्गदर्शन करून शिवजन्मोत्सवसाठी तन, मन, धनाने मदत करण्याचा शब्द दिला.छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे समन्व्यक म्हणून एड.भारत जाधव , दिगंबरराव जगताप , एड.अनिल ठाकूर ,एड. उमाकांत पापीनवार रवी ग्यानचंदानी अशोक बाबर जबाबदारी सांभाळणार आहेत.कार्यक्रमाचे संचालन चंद्रकांत ठेंगे तर आभार प्रदर्शन प्रा. अजय क्षीरसागर यांनी केले. सभेला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे तसेच महिला संघटनाचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकार, सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close