देव देवतांच्या वास्तव्याने पावन पुनीत माहूरगडाची परिक्रमा यात्रा आज पासून!

माहूर/प्रतिनिधी (संदीप कदम):-नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले माहूर गडावर असणाऱ्या पंचकोशीतील पूर्ण देव देवतांची श्रावण मासात परिक्रमेत आराधना करण्याची परंपरा आहे.
ही परिक्रमा परमपूज्य गुरु परविजाकाचार्य महंत मधुसूदन भारतीजी महाराज यांच्या आदेशाने दत्तशिखर येथील साधू संतांच्या उपस्थितीत होत असते आज नारळी पौर्णिमेनिमित्त माहूर गडाच्या पंचक्रोशीची परिक्रमा यात्रा यावर्षी आज ३० ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता दत्तशिखर येथून कमडलू कुंडाकडे निघणार आहे अशी माहिती संस्थांनचे व्यवस्थापन एडवोकेट उज्वलकुमार भोपी झेप न्यूज मीडिया प्रतिनिधीला दिली असून ही परिक्रमा कमडलू कुंडापासून प्रारंभ करून काळेश्वर मंदिर, सयामाता, टेकडी, मातृतीर्थ,
पांडवलेणी, देवदेवेश्वर मंदिर, वनदेव मंदिर, कैलास टेकडी, शेख फरीद, दत्तमांजरी मार्गे अनुसया माता मंदिर या मार्गे होणार आहे यासाठी माहूर गडावर दूर दुरून अनेक भाविक भक्त दाखल झाले असून माहूर शहराला गर्दीचे स्वरूप आले प्रशासनाने यासाठी जयत तयारी केलेली आहे.



