पुसद तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या: मनसे

पुसद: मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कालच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील हजारो एकर शेतातील पिक पाण्याखाली आले असून पावसाच्या अतिरिक्त माज्यामुळे असंख्य शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
जून महिन्यात कमी पावसामुळे आधीच शेतकन्यांनी उशीरा पेरणी केली. शनिवार सकाळी संपलेल्या पावसाने २४ तासात अंदाजे६६.५ मी.मी पाऊस नोंदविला गेला आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अनुषंगाने तहसीलदार पुसद यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे असे निवेदन मनसे च्या वतीने देण्यात आले यावेळी मनसे तालुका अध्यक्ष संदीप लांडे,शहर अध्यक्ष आकाश रहाटे,तालुका उपाध्यक्ष रवी सूर्य,शहर उपाध्यक्ष पवन भालेराव,प्रसिध्दी प्रमुख अभिषेक वंजारे,इटावा वार्ड शाखा अध्यक्ष कुणाल डहाळे,दिग्विजय लोहटे,सुकृत चक्करवार,अमर डाऊ,गोलू मस्के, बंटी मेटकर,बालाजी काळे,अमोल कवडे आदी जन यावेळी उपस्थित होते.