पैनगंगा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन करुन ट्रॅक्टरव्दारे रेती चोरी करणारे चार ट्रॅक्टर वर कारवाई एकूण १६लाख२४ हजाराचा मुददेमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची मोठी कारवाई!

यवतमाळ/प्रतिनिधी: जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दि.५ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात अउघड गुन्हे, आरोपी शोध, कामी रवाना झाले. पोलीस स्टेशन महागांव हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारा कडून माहीती मिळाली कि, मौजे फुलसावंगी गावच्या हद्दीत पैनगंगा नदीपात्रातून काही इसम टॅक्टरव्दारे रेती उत्खनन करुन चोरी करीत आहे अशी माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दोन पंचासह मिळालेल्या माहीती प्रमाणे फुलसावंगी गावच्या हददीत हिंगणी पादन रस्त्यावर सापळा लावला असता पैनगंगा नदीपात्रातून चार टॅक्टर अवैध विना परवाना रेती उत्खनन करुन चोरी करुन नेत असतांना मिळून आल्याने चार टॅक्टर व त्यामधील रेती असा एकूण १६२४०००/- रु मुददेमाल जप्त करुन इसम नामे-१) अमोल शामराव नखाते रा. फुलसावंगी ता. महागांव जि. यवतमाळ २) संदीप यादव राहटे रा. चिंचोली ता. महागांव जि. यवतमाळ ३) गजानन बापूराव आवळे रा. हिंगणी ता. माहूर जि. नांदेड ४) अक्षय गणेश इंगोले रा. हडसनी ता. माहूर जि. नांदेड यांना टॅक्टरसह ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन महागांव येथे कलम ३०३ (२) भान्यास सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (८) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, स. फी मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चा.पो. उप.नि. रविद्र शिरामे, चापोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



