गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये “शिक्षण सप्ताह” निमित्याने विविध उपक्रमाचे आयोजन!

पुसद:राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापण दिनानिमित्ताने केंद्र सरकारव्दारे सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये दिनांक २२ ते २८ जुलै २०२४ हा आठवडा “शिक्षण सप्ताह” म्हणुन साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्याच अनुषंगाने गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये सुद्धा सोमवार २२जुलै ते रविवार २८ जुलै पर्यंत आठवडाभर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये अध्ययन-अध्यापण साहित्य दिवस,मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस,क्रीडा दिवस,सांस्कृतिक दिवस,कौशल्य आणि डिजीटल उपक्रम दिवस,इको क्लब व शालेय पोषण आहार दिवस, समुदाय सहभाग दिवस आशा प्रकारचे विवीध आठवडाभर उपक्रम राबविण्यात आले.
यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभाग घेतला तसेच गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सर्वच शिक्षक/ शिक्षिका यांनी सदर उपक्रमात मोलाचे योगदान दिले.
तसेच विशेष करुन मा.सुशीला अवटे मॅडम(गट शिक्षणअधिकारी) व मा. फोपसे मॅडम (विस्तार अधिकारी) आणि मा.देवानंद मोहिते सर(केंद्र प्रमुख) यांचे या उपक्रमासाठी वेळो-वेळी योग्य मार्गदर्शन लाभले.
तसेच शाळेमध्ये उपक्रमाच्या योग्य अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक मोहम्मद सादिक शेख सरांनी प्रत्येक दिवशीचे योग्य नियोजन करून नोडल अधिकारी म्हणून सैय्यद सलमान सै.शेरू सरांनी नियुक्ती केली.त्यानुसार सदर “शिक्षण सप्ताह” हा उपक्रम शाळेमध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आला.