उद्या पुसद येथे शास्त्रीय सुगम संगीत गायन कार्यक्रमाचे आयोजन!

पुसद: स्थानिक नादब्रम्ह संगीत विद्यालय व नादब्रम्ह संगीत सेवक क्लासेस पुसदच्या वतीने गुरू पौर्णिमा उत्सव २०२४ निमित्य, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिध्द गायक श्री मयुर महाजन, पुणे यांच्या शास्त्रीय व सुगम संगीत गायनाचा कार्यक्रम उद्या दि. ४ ऑगष्ट ४०२४ रोजी जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, मोतीनगर पुसद येथे आयोजित केला आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे गायन व वादन सादरीकरण होईल. याच सत्रात श्री मयुर महाजन हे विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत श्री मयुर महाजन यांचा शास्त्रीय व सुगम संगीत गायनाचा कार्यक्रम होईल.मयुर महाजन हे उच्च प्रशिक्षित शास्त्रीय गायक असुन त्यांनी विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. तसेच ते संगीत अलंकार, एम ए गोल्ड मेडलिस्ट गायक असुन त्यांनी विविध महोत्सवात आपल्या प्रभावी गायन शैलीतुन आपली कला सादर केली आहे. पुसदवाशियांना शास्त्रीय संगिताची आवड निर्माण व्हावी व शास्त्रीय संगिताचा वारसा भावी पिढीत रुजावा म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक मयुर महाजन यांच्या सुगम संगित गायनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद परिसरातील सर्व संगित कला प्रेमी, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्रमोद जयस्वाल सर, नादब्रम्ह संगीत विद्यालय पुसद व प्रशांत आत्राम नादब्रम्ह संगीत सेवक क्लासेस, पुसद यांनी केले आहे.