एक गाव, एक गणपती’ नानंद खुर्द ची विस वर्षांपासून परंपरा कायम!

पुसद: तालुक्यातील येथे गेल्या विस वर्षांपासून एक गाव, एक गणपती’ नानंद खुर्द ची परंपरा कायम आहे.वीस वर्षाखाली प्रेरणा गणेश मंडळाची स्थापना काही ज्येष्ठ लोकांच्या संकल्पनेतून गावसभेच्या ठरावानुसार गावात एकमत झाले आणि तेव्हापासून गावात ‘एक गाव-एक गणपती’ संकल्पना उदयास आली. श्रीच्या मूर्ती समोर ज्योत ज्योत तळपत ठेवण्याचा गावातील युवकांनी मानस केला आणि ती ज्योतदर वर्षी प्रमाणे माहुर गडावरून आणली जाते ती आजतागायत ही संकल्पना कायम आहे.
गणेशोत्सव हा आनंदाच्या पर्वणीचा सण. भावभक्तीचा गजर व मनोरंजनाच्या माध्यमातून सर्वांना अकरा दिवस निखळ आनंद देणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. अलीकडे सार्वजनिक मंडळांची संख्या वाढत असल्याने भाविकसुद्धा विभागले जात आहेत. यामुळे खर्चही वाढत आहे. ग्रामीण भागात एकोपा टिकून राखण्यासाठी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना अधिक रुजविणे गरजेचे आहे. लोकांना संघटित करता यावे हाच गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
नानंद खुर्द गावातील काही तरुणांनी एक गाव एक गणपती या संकल्पनेचे महत्त्व पटवून दिल्याने तरुणवर्गानेही ही प्रथा अखंडपणे सुरू ठेवली आहे. गावातील गणेशोत्सव पूर्णपणे विधायक स्वरुपात साजरा केला जातो.थेट माहूरगडावरून अखंड ज्योतआणुन ती ज्योत दाह दिवस अखंड प्रज्वलीत ठेवतात ज्योत मंडळ प्रेरणा गणेश मंडळातील सदस्य कार्यकर्ते दरवर्षी मोठ्या उत्साहाने ज्योत आणायला जातात गावात दहा दिवस कीर्तन व भजनाचा भक्तिमय वातावरणात व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात.
यामध्ये प्रेरणा गणेश मंडळाचे अध्यक्ष नारायण धोत्रे उपाध्यक्ष समाधान टारफे सचिव विजय काळे सदस्य राजू डेंगळे सुरज बोडके माधव धोत्रे वैभव डुकरे वैभव काळे राहुल जटाळे आकाश बेले दिनेश सावंत विशाल उडाळकर अजय वडुळकर मारोती खराटे प्रवीण प्रवीण टारफे रामेश्वर बोंडे योगेश आमले अविनाश सावंत सुनील वडुळकर बाबू बेले संतोष दांडेगावकर गावातील प्रतिष्ठित नागरिक दहा दिवस अथक परिश्रम घेतात आणि गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.



