ईतर

आरक्षणामुळे ओबीसींच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला- डॉ .प्रा. ओम सुधा. जे एन. यू 

धम्मनायक सम्राट अशोक, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव प्रज्ञा पर्व कार्यक्रमातील पहिले ५वे सत्र..

पुसद: धम्मनायक सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञापर्व समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून काल दि.११ एप्रिल २०२५ डॉ.प्रो. ओम सुधा जे. एन. यु. हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

 

सर्व प्रथम प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून धम्मनायक सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

 

संबोधी महिला मंडळ श्रावस्ती नगर, पंचशील महिला मंडळ धनकेश्वर पुसद यांच्या वतीने बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शरद मैंद म्हणाले की आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांची परंपरा लाभलेली आहे याच परंपरेला जपत प्रज्ञापर्व समिती दरवर्षी प्रमाणे प्रबोधनाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचे विचार जन सामान्य पर्यंत पोहोचवत आहे. आणि मला या कार्यक्रमाला बोलावून अध्यक्षपद दिले समितीचे व समाज बांधवांचे धन्यवाद व्यक्त करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.भारतीय संविधानाच्या माध्यमातून वंचित उपेक्षित श्रमिक ओबीसी समूहाला जे आरक्षण मिळाले आहे त्याच आरक्षणामुळे सामान्य ओबीसीच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे, त्याचे श्रेय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आहे.परंतु आरक्षणाचा लाभ घेणारे मात्र दैववादाला खतपाणी घालून ते इतरांना श्रेय देण्यात आपली धन्यता मानतात.भारत देशामध्ये गाढव, कुत्रा, यासारख्या मुक्या प्राण्याची जनगणना होते परंतु ओबीसी समूहाची जनगणना होत नाही याचे कारण सरकार घाबरत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.जर सरकारने ओबीसी समूहाची जनगणना केली तर ८५ ते ९० टक्के असलेला ओबीसी समूह नोकरीतील तीन टक्के वाल्यांना भारी पडणार? आहे त्यामुळे येथील सरकार ओबीसीची जनगणना करत नाही.

अशा परखड शब्दांमध्ये ओम सुद्धा यांनी मनुवादी विचारसरणीच्या  व्यवस्थेची चिरफाड केली. ओबीसी समूहा बरोबरच सर्व वंचित श्रमिक वंचित दलित बौद्धांनी संविधानाची सुरक्षा केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम दलित बौद्धना टारगेट गेले जाऊ शकते असे संकेत याप्रसंगी प्रज्ञापर्व च्या पाचव्या सत्रा मध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीचे डॉ. प्रोफेसर ओम सुधा यांनी बोलताना धोक्याचे संकेत दिले. यावेळी सर्वच प्रमुख उपस्थित अतिथी यांना प्रज्ञा पर्वत समितीच्या वतीने ट्रॉफी शील व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला प्रमुख वक्ते,डॉ. प्रोफेसर ओम सुधा, जे एन यू.या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शरद मैंद, अनुकूल चव्हाण, डॉ. शिवाजी भुरके, ऍड, यादव जांभुळकर, यशवंतराव देशमुख, प्रज्ञा पर्व समिती २०२५ चे अध्यक्ष मिलिंद जाधव इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, एडवोकेट पद्माकर विघ्ने, तर आभार संतोष गायकवाड यांनी केले.या कार्यक्रमाला महिला, बालक, पुरुष व असंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close