सामाजिक

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या १५० व्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय एकता दिवशी पुसद शहरात ‘रन फॉर युनिटी’ (Walkathon) आयोजनात सहभागी होण्याचे पो.नि.सेवानंद वानखेडे यांचे आवाहन!

पुसद : भारताचे ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून उद्या ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी साजर करण्यात येणार आहे. ‘राष्ट्रीय एकता दिवस’ यंदा विशेष असणार आहे. सरदार पटेलांची ही १५० वी जयंती असल्याने,हा दिवस भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणार आहे.

सरदार पटेलांनी स्वतंत्र भारताच्या निर्मितीमध्ये आणि ५६२ संस्थानांचे विलीनीकरण करून आधुनिक भारताचा पाया रचण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भारताची एकता आणि अखंडता जपण्याचे महत्व अधोरेखित केले होते त्यांच्या याच योगदानामुळे त्यांना ‘राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार’ आणि ‘भारताचे लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाते त्यामुळे या महापुरुषाच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुसद शहरात ‘रन फॉर युनिटी’ (Walkathon) आयोजन दि. शुक्रवार ३१ ऑक्टोंबर२०२५ रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास मा. सहा पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय पुसद, पो. स्टे. पुसद शहर, पो. स्टे. वसंतनगर पुसद, नगर परिषद पुसद व रोटरी क्लब ऑफ पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात येणार आहे. या ‘रन फॉर युनिटी’ (Walkathon) मध्ये सहभागी होण्यासाठी अधिकारी/कर्मचारी, शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी व विद्यार्थीनी, पत्रकार संघ तसेच पक्ष व संघटनेतील सदस्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहुन या राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे साहेब यांनी केले आहे.

‘रन फॉर युनिटी’ (Walkathon) चा मार्ग खालीलप्रमाणे राहील अशी सूचना केली आहे.

पुसद शहरातील यशवंत रंगमंदीर, तहसिल चौक, स्व. गोदाजी मुखेर चौक, स्व. वसंतराव नाईक चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, कापड लाईन मेन रोड,नगिना चौक, आझाद चौक, महात्मा गांधी चौक,नगर परिषद समोरून तहसिल चौक ते यशवंत रंगमंदीर येथे समापन होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी कर्मचारी नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close