९ सप्टेंबर रोजी पुसद येथे लोकन्यायालयचा पक्षकाराने लाभ घ्यावा-व्ही. बी. कुलकर्णी जिल्हा न्यायाधीश!

पुसद:मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, व जिल्हा विधी सेवा समिती यवतमाळ तसेच पुसद तालुका विधिसेवा समिती नुसार पुसद न्यायमंदिरात शनिवार, दि. ०९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता लोकन्यायालयाचे आयोजन केले आहे. यात मोठया संखेने सहभागी होउन पक्षकारांनी लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुसद तालुका विधिसेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश वसंत कुळकर्णी यांनी केले आहे. लोकन्यायालयामुळे गोरगरिबांना जलद गतीने न्याय देण्याचा उद्देश साध्य होतो. व पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत करण्यासाठी लोकन्यायालय हे अतिशय उपयुक्त साधन असून याव्दारे सामोपचार, तडजोडीतून न्यायालयीन प्रकरणात दोन्ही बाजूंचे समाधान होऊ शकते. यामुळे न्यायालयावरचा खटल्यांचा भार कमी होऊन गोरगरिबांना समाधानाने व लवकर न्याय मिळू शकतो. त्यामुळे लोक न्यायालयाकडे लोकांचा कल वाढला आहे. करिता येणा-या लोक न्यायालयामध्ये सर्व पक्षकारांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन व्ही. बी. कुलकर्णी यांनी केले आहे.



