ईतर

शिवसेना ,(उबाठा) पक्षाच्या वतीने पुसद येथे पिकविमा अधिकाऱ्यास घेराव!

पुसद: येथील पिकविमा अधिकाऱ्यास दि.१४ ऑगस्ट रोजी स्थानिक पुसद तालुक्यातील पिक विमा योजनेचे दरवर्षी काम करणा-या मुलांना डावलुन बाहेर जिल्ह्यातील मुलांना पिक विमा योजनेवर काम देण्यात आले या बाबत अन्याय झालेल्या मुलांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांचेशी संपर्क करुन अन्याय झाले बाबत आपबिती सांगितली की आम्ही गेले दोन तीन वर्ष सदर पिक विमा योजना चे काम करित आहो शेतकरी बांधवांशी सुसंवाद सांगुन पिक विमा काढत असतो जवळ पास ३००, ४०० मुलांना रोजगार मिळतो परंतु यावर्षी सदर पिकविमा योजना पुवींचे कंपनी ला न देता रिलायन्स कंपनी ला देण्यात आला सदर कंपनी ने इतर संस्थेस दीले सदर संस्थेने स्थानिक पिकविमा काम करणाऱ्या मुलांना डावलुन बाहेर जिल्ह्यातील मुलांना पिक विमा योजनेचे काम देण्यात आले या मुलांवर झालैल्या अन्याय ची दखल घेवुन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुसद विधानसभा संपर्कप्रमुख भोलाभाउ राठोड यांनी पुसद येथील कार्यालयात जावुन कंपनी चे मॅनेजर यांना जाब विचारला तर यावर जिल्हा अधिकारास संपर्क केला व त्वरीत कामावर घेण्याचे आदेश काढा असे सांगीतले

त्यावर संबंधित अधिकारी यांनी कामावर घेण्याचे आश्वासन दिले जर कामावर न घेतल्यास परत जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेशी संपर्क करावा लागेल व आपल्या अधिका्रास जाब विचारु व तिव आंदोलन छेडण्यात अशा इशारा देण्यात आला यावेळी शिवसेनाचे रंगराव काळे माजी शिक्षणाधिकारी तसेच विकास जामकर सहसंपर्कप्रमुख , राजु वाकडे माजी उपजिल्हाप्रमुख, रवि पांडे तालुका प्रमुख, मोहन विश्वकमा, संतोष धरणे शहर प्रमुख, विजय बाबर , संजय जोगदंड, सुशिल करे हम अनेक शीवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close