पुसद येथील को. दौ. विद्यालयात ‘स्नेह-मिलन’ कार्यक्रमात २७ वर्षानी आले मिञ एकत्र!

पुसद :- येथील नामाकिंत व सर्वात जुने विद्यालय कोषटवार दौलतखान विद्यालय येथे १९९७ च्या १० व्या वर्गाच्या सेमी-इंग्रजी माध्यमाच्या विदयाथ्यांचा २७ वर्षानंतर “स्नेह मिलन” संपन्न झाला.
‘स्नेह मिलन’ कार्यक्रम प्रथम सत्रात सर्व विद्यार्थी पुसद येथिल बजाज फार्म हाऊस येथे जमले सर्वांनी आपआपले परिचय, सध्याचे ठिकाण अवगत करून शाळेय जुन्या आठवणीला उजाळा दिला तसेच कार्यक्रमात खेळ खेळण्यात आले व डॉ. राजिव राठोड, अँड. विरेन्द्र राजे, स्नेहा काळे (राऊत),क्षितिज पापीनवार,योगेन्द्र राठी यांनी फिल्मी गित गाऊन कार्यक्रमाला रंगत आणली. संचालन क्षितिज पापीनवार यांनी केले.
‘स्नेह- मिलनाच्या दुसऱ्या सत्रात को. दौ. विद्यालय येथे १९९७ च्या बॅच चे सर्व शिक्षक वृद्ध यांच्या समेत स्नेह मिलन पार पडले. कार्यक्रमात अध्यक्षस्थानी रायपुरकर सर, प्रमुख अतिथी गजानन वायकुळे सर मंचावर उपस्थित होते. वर्ग १० ला १९९७ च्या बॅच ला शिकवणारे पी. उपाध्ये सर, श्रीमती डेकाटे मैडम, रेवणवार सर, काळे सर, कोरटकर सर, खडसे सर, रामधनी सर, पाटिल सर, गहारवार मॅडम, महाजन सर, श्रीमती राऊत मॅडम, जोशी सर व शाळेय मदतनीस अनिल धुळे, नंदु पेन्शनवार यांचे विद्यार्थ्या तर्फे शाल, श्रीफल, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच १९९७ च्या बँच चे विद्यार्थी अमोल बोजेवार यांनी भारतीय थलसेनेत २० वर्षे सेवा दिली त्याबद्दल सर्व विद्यार्थी , शिक्षक तर्फे सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी आपआपला परिचय गुरुजणानां करुन दिला. रामधनी सर, संजय कोरटकर सर, पाटील सर, गहारवार मॅडम यांनी विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव गित गायन केले. कार्यक्रमासाठी मुंबई, पुणे, बैगलौर, नाशिक, नागपुर, कोल्हापुर, नांदेड तसेच स्वाती पलिकोंडावार ही अमेरीका येथुन तर रुपेश सोनवाल हे इंग्लंड वरुन आले व इतरस्त दुर दुरुन विद्यार्थी उपस्थीत झाले होते. सर्व विद्यार्थ्याचा ग्रुप फोटो काढण्यात आला तसेच कार्यक्रमात सर्वाना रवी ग्यांनचंदानी तर्फे काढलेल्या फोटो फ्रेम करून सर्वांना भेट देण्यात आली.
स्नेह मिलन कार्यक्रमात सर्व शिक्षक तथा विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणीला उजाळा दिला हया वेळी सर्वच जण भावविभोर झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक समिर सोनटक्के यांनी केले. संचालन अँड. विरेंद्र राजे तथा आभार राहुल मस्के यांनी मानले.२७ वर्षानी विद्यार्थी, गुरुजण एकत्र आणुन ‘स्नेह मिलन ‘ यशस्वीते साठी डॉ. प्रणाली इंगळे, वैभव बजाज, अभिजित बासटवार, पंकज भागवत यांच्या समवेत पुसद येथील स्थानीक रहवाशी विदयार्थ्यानी सहकार्य केले.सदर माहिती १९९७ च्या बॅचचे विद्यार्थी पत्रकार रुपेन्द्र अग्रवाल यांनी दिली.



