ईतर

जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा!

पुसद:मा. उच्च न्यायालय मुंबई व मा. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, यवतमाळ यांचे निर्देशानुसार तसेच तालुका विधीसेवा समिती, पुसद व वकिल संघ, पुसद यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १३.०३.२०२४ रोजी दुपारी २.१० वा पुसद येथील न्यायालयातील केंटीग हॉलमध्ये जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमास मा. श्रीमती एन. एच. मखरे मॅडम, जिल्हा न्यायाधिश- २. पुसद, श्री. एन.जी. व्यास साहेब, सहदिवाणी न्यायाधिश क. स्तर, पुसद, श्री. डि. जी. म्हस्के साहेब, २रे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर, पुसद श्री. व्ही.एस. वाघमोडे साहेब, ३ रे सह दिवाणी न्यायधीश क.स्तर, पुसद, श्री. झेड. झेड. कादरी साहेब, ७ वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, पुसद, त्याचप्रमाणे अॅड. अंबिका जाधव, उपाध्यक्षा, वकील संघ, पुसद, अॅड. सुचिता नरवाडे, अॅड. सुशिला नरवाडे, अॅड. ममता सगणे, अॅड. श्वेता पांढरीपांडे, अॅड के. एम. राठोड, अॅड. भालेराव, अॅड. गावंडे, त्याचप्रमाणे न्यायालयीन कर्मचारी ब-याच संख्येने जसे की, श्रीमती काळबांडे, श्री. यावले, श्री. डोईजड, श्री. डाफ, श्री. रणबावळे, श्री. मुळावकर, श्रीमती पवार, कु. बेले, श्री. कांबळे, श्री. जोशी तसेच पोलीस कर्मचारी, सामान्य नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.सर्वप्रथम मा. श्रीमती एस.जी. जाधव, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, पुसद, यांनी आजची महिला ही पुरुषाच्या खांदयाला खांदा लावुन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करीत असुन त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे कल्पना चावला तसेच सुनीता विल्यम आहेत विरांगणीमध्ये राणी लक्ष्मीबाई हे आहेत. तसेच त्यांनी महिला किती सक्षम आहे याबाबत उदाहरणासहीत स्पष्टीकरण दिले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक मा. श्री. गोविंद एस. वर्षे, ५ वे सह. दिवाणी न्यायाधीश क. स्तर, पुसद यांनी घरगुती हिंसाचार कायदयापासुन महिलांचे संरक्षणाबाबत महिलांना दिलेले अधिकाराबाबत मोलाचे मार्गदर्शन केले तसेच महिलांविषयी असलेल्या वेगवेगळ्या कायदयांविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती त्यांनी उपस्थीत असलेल्या महिलांना समजावुन सांगितली, त्यांनतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. व्ही. बी. कुळकणी साहेब, जिल्हा न्यायाधीश – १. पुसद यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये जागतिक महिला दिनाचे महत्तव पटवुन सांगितले. जुन्या काळात महिलांना चुल व मुल पुरतेच संबोधिल्या जात असे परंतु आज महिला व पुरुष हे एकाच रथाचे दोन चाके असुन महिला हया पुरुषांपेक्षा फार मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवर कार्य करीत आहे. भारतीय महिला आधीच्या तुलनेत खरंच विकसित किया समृदच झाल्याचं अनुभवत आहोत? याची पडताळणी करणे गरजेचे आहे. महिला ही आजच्या काळामध्ये खुप सक्षम आहे हे आवर्जुन सांगितले. स्वीयावरील अत्याचार रोखणे व मुलींना प्राधान्य देणे फार गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आपला समाज विकसित होत आहे तसे स्त्रीयांच्या बाबतीत आपले विचार देखील विकसित होणे आवश्यक आहे. आपल्या देशात मुलगी हि जन्माच्या अगोदर व जन्माच्या नंतर देखील सुरक्षित असली पाहीजे परंतु आज ब-याच ठिकाणी अजुनही मुलगी सुरक्षित नाही. पुढे त्यांनी असेही म्हटले की, जन्म आणि मृत्यु हया बाबी परमेश्वराचे हातात असतात याचे आपण नेहमी भान ठेवले पाहीजे परंतु आपल्यामधील काही लोक स्वतःलाच परमेश्वर समजुन गर्भात असणा-या बाळाची हत्या करतात कारण ती एक मुलगी असते. स्त्रीभ्रुण हत्या हे कायदयामध्ये अपराध आहे हयाची समाजात जागरुकता होणे गरजेचे आहे.पुर्वी आपल्या देशामध्ये स्वीचीच प्रधानता होती व स्त्री सत्ता होती व महत्व होते. कारण आपल्या सर्व देवता या देवींच्या स्वरुपात जास्त प्रमाणात आहेत. हा देश अनेक विरांगणाचा आहे. अनेक स्त्रीयांनी खुप मोठा पराक्रम केलेला आहे. कारण स्त्रीयांना आपल्या देशामध्ये फार पूर्वीपासुन परुषांपेक्षाही मोठा दर्जा होता कारण स्त्रीचे मुळातील अस्तीत्व है जननी असे आहे. त्यामुळे जागतिक महिला दिनाचे महत्व लक्षात घेणे आवश्यक आहे व मातृशक्तीला सतत स्मरणात ठेवणे गरजेचे आहे. असे मोलाचे मार्गदर्शन मा. श्री. व्ही. बी. कुळकर्णी साहेब, जिल्हा न्यायाधिश-१, पुसद यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन अॅड. सविता आढाव, सदस्य, वकिल संघ पुसद यांनी पार पाडले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अॅड. जयश्री देशमुख, सदस्य, वकिल संघ पुसद यांनी सुनियोजीत पध्दतीने पार पाडले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close