भरसभेत नितीन गडकरींना भोवळ, औषधोपचारानंतर पुन्हा भाषणाला सुरुवात!

पुसद: येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात महायुतीच्या वतीने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ. राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आज दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत सर्वांची भाषणे झाल्यानंतर नितीन गडकरी हे बोलण्यासाठी उभे राहिले असता त्यांनी सुधाकरराव नाईक यांच्या आठवणी सांगत शेतकऱ्यांना शेती फायद्यात कशी आणायची याचे सल्ले दिले. जवळपास १५ मिनिटे ते बोलत होते. भाषणाच्या अखेरीस त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मंचावरील व्यक्तीस कुलर आपल्याकडे करण्यास सांगितले. त्यावेळी पुढे बोलताना त्यांचा स्वर कापरा झाला. तरीही त्यांनी सौ. राजश्री पाटील यांना निवडून द्या, असे आवाहन केले आणि हे आवाहन करत असतानाच अचानक त्यांना भोवळ आली आणि त्यांचा तोल गेला. त्यांनी पोडियमला धरून सावरण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षक व मंचावरील आमदार ॲड.निलयभाऊ नाईक व इतरांनी धावत जावून त्यांना उलचून खुर्चीत बसविले.
त्यानंतर गडकरी यांना तातडीने ग्रीन रूममध्ये नेण्यात येवून डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. परंतु त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे उपस्थितीताच्या लक्षात आले की दोन मिनिटात ते बोलतांना कोसळल्याने तारांबळ उडाली या प्रकाराने सभास्थळी एकच खळबळ उडाली. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याने पुन्हा त्यांनी भाषणाला सुरुवात केली.
देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या प्रचार सभाही जोरदार सुरू आहे. तर राज्यात उन्हाचा तडाखाही पाहायला मिळत आहे. अशातच कशाचीही तमा न बाळगता राजकीय नेते आपल्या प्रचारसभा घेतायतं.विदर्भात उन्हाचा प्रचंड तडाखा आहे. यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ. राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आज दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास पुसद येथील शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात सभा आयोजित करण्यात आली होती.
पुसदमध्ये तुलनेने अधिक ऊन आहे. गडकरी यांची सभा भर उन्हात ठेवण्यात आली होती. त्यातही सभा विलंबाने सुरू झाली. कापडी मंडप असल्याने उकाडा खूप होता.या सभेत सर्वांची भाषणे झाल्यानंतर नितीन गडकरी हे बोलण्यासाठी उभे राहिले असता त्यांनी सुधाकरराव नाईक यांच्या आठवणी सांगत शेतकऱ्यांना शेती फायद्यात कशी आणायची याचे सल्ले दिले. जवळपास १५ मिनिटे ते बोलत होते. भाषणाच्या अखेरीस त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी कुलर आपल्याकडे वळविण्याची सूचना केली तेव्हाच त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. तेथून दोन मिनिटांतच ते बोलताना कोसळल्याने तारांबळ उडाली. या प्रकाराने सभास्थळी एकच खळबळ उडाली असून अनेकांनी गडकरींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सभास्थळी धाव घेतली यातच, अंगरक्षकांनी त्यांना सावरलं आणि खुर्चीवर बसवलं. यावेळी माहायुतीचे नेते पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. दरम्यान, त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले. वैद्यकीय उपचारांनंतर त्यांची प्रकृती व्यवस्थित झाल्यावर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. देशात विकासाचे पर्व सुरू असून यामध्ये प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे, असं नितीन गडकरी म्हणाले विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षांच्या काळात देशभरात रस्ते-महामार्ग तसेच शिक्षण, स्वास्थ्य व अन्य क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागापर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवल्या गेल्या. यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनतेलाही अनेक महत्वपूर्ण सुविधांचा लाभ घेता येत आहे. सातत्याने विकासाची ओढ असलेली यवतमाळ जिल्ह्यातील जनता यावेळीही सर्वांगीण विकासाचा विश्वास देणाऱ्या भाजप-महायुतीला विजयी करेल असा मला विश्वास आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.नितीन तसंच, “माझी प्रकृती आता बरी असून मी पुन्हा दुसऱ्या कार्यक्रमासाठी वरूड येथे जाण्यासाठी निघालो आहे. तुमच्या स्नेह आणि आशीर्वादासाठी धन्यवाद”,नितीन गडकरींनी एक्स पोस्ट केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भरसभेत भोवळ येण्याचं ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांना अनेकदा भोवळ आलेली आहे.याआधीही २०१९ साली १ ऑगस्टला गडकरी यांना सार्वजनिक कार्यक्रमात भोवळ आली होती. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात समारोपावेळी राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना भोवळ आली होती. राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरी अचानक खाली बसले आणि पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना भोवळ आली. तर, अहमदनगरमधल्या एका कार्यक्रमात गडकरींना भोवळ आली होती. पश्चिम बंगालमध्येही एका जाहीर कार्यक्रमादरम्यान गडकरींची तब्येत बिघडली होती. भाषण सुरू असताना अचानक त्यांना भोवळ आली. २०१९ साली शिर्डीमधील एका कार्यक्रमामध्ये स्टेजवरच असताना ते कोसळले होते.



