ईतर

पुसद न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालत संपन्न;१,९६,६२,५२२ रक्कम आपसी तडजोडीतुन वसुल!

पुसद: येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतिचे आयोजन करण्यात आले होते. या लोक आदालत मध्ये आज १,९६,६२,५२२/- (एक कोटी शहान्नव लाख बासष्ट हजार पाचशे बावीस फक्त) इतकी रक्कम आपसी तडजोडीतुन वसुल करण्यात आली आहे.

याबाबत न्यायालयाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समिती यांचे आदेशान्वये व वकीलसंघ, पुसद यांचे संयुक्त विदयमाने आज दि.९ डिसेंबर२०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालत व्हि. बी. कुळकर्णी, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तसेच जिल्हा न्यायाधीश-१, पुसद यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सदर राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पैनल क्र. १ वर पैनल न्यायाधीश म्हणून व्हि. बि. कुळकर्णी साहेब, जिल्हा न्यायाधीश-१, पुसद, पॅनल क्र.२ वर एस.एन. नाईक साहेब, सहदिवाणी न्यायाधिश व. स्तर, पुसद पॅनल क्रं.३ वर डि.जी. म्हस्के साहेब, २रे सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर पुसद, पॅनल क्र.४ वर मा.श्रीमती एस.जी. लोहकरे जाधव मॅडम, ४थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, पुसद, पैनल क्र.५ वर जी.एस. वर्षे साहेब, ५वे सह- दिवाणी न्यायाधीश क. स्तर पुसद, पैनल क्र.६ वर झेड. झेड. कादरी साहेब, ७वे सहदिवाणी न्यायाधिश क.स्तर, पुसद हे पैनल न्यायाधीश म्हणून हजर होते. तसेच जिल्हा न्यायालय-१, पुसद येथील प्र. अधिक्षक श्रीमती. एम.आर. काळबांडे आणि विधीज्ञ ॲड. दिनेश राठोड, ॲड. श्वेता पांढरीपांडे, ॲड. सुशिला नरवाडे ॲड. जयश्री देशमुख, ॲड.ममता सगणे, ॲड. वटटमवार व इतर विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी हजर होते.
सदर लोकअदालतमध्ये वादपूर्व प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात दावे, चेक बाऊन्स (१३८ एन.आय. ॲक्ट) प्रकरणे, वाहन कायदा संदर्भाचे प्रलंबित असलेले व इतर प्रकरणे मिळून एकूण ठेवण्यात आलेले ४,२१९ असून त्यापैकी एकूण २७७ प्रकरणे समझोताद्वारे निकाली काढण्यात आलेले असून अशी एकूण रक्कम १,९६,६२,५२२/- (एक कोटी शहान्नव लाख बासष्ट हजार पाचशे बावीस फक्त) इतकी रक्कम आपसी तडजोडीतुन वसुल करण्यात आलेली आहे.
सदर लोकअदालतमध्ये तालुका विधी सेवा समिती, पुसद येथील पी.एन. भोयर, कु. ए.डी. बेले, जे.जे.जाधव, एस.एन. पाथरकर,पि.ए. कोयरे, निलेश एम. खसाळे, टी. जी. सुर्यवंशी, ए.व्ही ढंगारे, डी.पी. रणबावळे, व्ही. आर. चावरे व ईतर ब-याच संख्येने न्यायालयीन कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close