ईतर

नमो ग्राम सचिवालयाच्या इमारतीचं काम सुरू होण्याआधीच नामांतरावरुन राजकारण:श्रिरामपुर ग्रामपंचायतीचे सरपंच आशिष काळबांडे यांचा खुलासा!

पुसद:देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने लोकोपयोगी उपक्रमांतर्गत ग्रामपातळीवरील ग्राम विकास, महसूल, कृषी, विद्युत मंडळ विभागांच्या सेवा या ग्रामस्थांना अधिक कार्यक्षमतेने उपलब्ध करून देण्यासाठी नमो ग्राम सचिवालयाच्या माध्यमातून शक्य होणार आहे. त्यासाठी श्रीरामपूर ग्रामपंचायतीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण नमो सचिवालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.त्या अनुषंगाने आमदार इंद्रनील नाईक यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत नमो ग्राम सचिवालय उभारणीसाठी टेंडर काढून वर्क ऑर्डर सुद्धा झाली असून निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्याने हे काम रखडले होते परंतु ही वास्तु उभारण्या आधिच श्रीरामपूर ग्रामपंचायतीमध्ये या वास्तूच्या नांमातरावरुन आरोप प्रत्यारोप सुरू असून ग्रामपंचायतीचे सदस्यांनी घेतलेल्या आरोपावरून सरपंच आशिष काळबांडे यांनी खुलासा केला आहे.

५ डिसेंबर २०२४ रोजी जी मामिकमभा झाली ती तहकुब मासिकसभा होती आणि या सभेमध्ये फक्त विषय सूची वरील विषयावरच चर्चा होत असते. नवीन विषय कोणताही घेता येत नाही. परंतु सन्माननीय सदस्य दिनेश राठोड यांनी अर्ज आणला होता तो मी पाहिला असता त्यामध्ये माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक साहेव यांचे नाव असल्याने मी तो अर्ज सचिवास वाचण्यासाठी सांगितले होणाऱ्या नमो ग्राम सचिवालय “ह्या इमारतीला नाव देण्याविषयी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊ असे सांगितले ” याचा अर्थ मी विरोध केला असा होत नाही.कै. वसंतरावजी नाईक साहेब हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असून सर्व ममाजाचे सुद्धा श्रद्धास्थान आहे. त्यांचे नावास मी विरोध करणे किंवा उडवा उडविच उत्तर देण्या एवढा मी मोठा नाही.आज मी ज्या ठिकाणी आहे, माजी मंत्री मनोहरराव नाईक साहेव यांच्या आशिर्वादाने आहे.माझ्या विरोधकांकडून माझ्या भूमिकेच्या विपर्यास करून मला विरोध करण्यासाठी आणि विनाकारण बदनाम करण्यासाठी जनभावना क्लेशीत करण्याचे काम काहीलोक जाणीवपूर्वक करीत आहेत.ही वास्तु आमदार इंद्रनील नाईक यांचे प्रयत्नाने “नमो ग्राम सचिवालय” या नावाने मंजूर झाली असून, या इमारतीच्या कामाचे कार्यरंभ आदेश जिल्हा परिषद द्वारे कंत्राटदारास देण्यात आले असून, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काम अद्यापही सुरू झालेले नाही. ही इमारत बांधकाम पूर्ण झाल्यावर लोकार्पण सोहळ्यापूर्वी हा विषय ग्रामपंचायतीच्या ठरावात एकमताने घेऊन निश्चितच आपण कै. वसंतराव नाईक साहेब यांचे नाव थाटामाटात देऊ यात कोणीही शंका उत्पन्न करू नये. फक्त एकच विनंती आहे हा विषय कायदेशीर रित्या ग्रामसभेमध्ये मांडून त्यावर ठराव घ्यावे लागतो. तेव्हा सुद्धा सन्माननीय सदस्यांच्या नावाने हा ठराव नोंदवीला जाईल.मासिक सभेत अध्यक्ष या नात्याने काही सूचना मांडणे माझा कर्तव्याचा भाग आहे. याचा अर्थ वेगळा काढून केवळ राजकारनासाठी देवतुल्य महामानव यांच्या नावाचा वापर करू नये ही विरोधकांना कळकळाची विनंती करण्यात आली आहे त्यामुळे विरोधकांकडून माझी बदनामी करण्याचा कट आहे नमो ग्राम सचिवालयाच्या इमारतीचं काम सुरू होण्याआधीच नामांतरावरुन जाणीवपूर्वक राजकारण केले जात असल्याचे श्रिरामपुर ग्रामपंचायतीचे सरपंच आशिष काळबांडे यांचा खुलासा केला आहे.तर नाईक समर्थक सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक नरेंद्र जाधव यांनी श्रीरामपूर ग्रामपंचायतचे सरपंच आशिष काळबांडे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close