न.प.हद्दीत बेकायदा झुणका-भाकर केंद्रांच्या नावाखाली शासनाची जागा बळकविणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून जागा तात्काळ ताब्यात घ्या; सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी!

पुसद: नगर परिषद हद्दीतील झुणका -भाकर केंद्रांच्या जागेचा वापर ज्या उद्देशासाठी दिल्या होत्या त्या सर्व जागेवर झुणका-भाकर केंद्रा ऐवजी ह्या जागा भाडेतत्त्वावर देऊन ईतर व्यवसाय सुरू केल्याप्रकरणी या केंद्र चालकावर दंडात्मक कारवाई करून बेकायदा या जागेचा वापर होत आसल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत ८ जानेवारी २०१६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार ह्या सर्व जागा तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली असून अशी तक्रार राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुसद नगरपरिषद हद्दीत सन १९९५ मध्ये तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकारने जनतेला पोटभर अन्न देण्याच्या उद्देशाने शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून झुणका-भाकर केंद्र योजना सुरु केली होती. व या झुणका-भाकर केंद्रांकरिता आपल्या नगरपरिषद कार्यालयाने शहरातील मोक्याच्या ठिकाणीच्या जमिनी दिल्या होत्या.पंरतु कालांतराने ही झुणका-भाकर केंद्रे चालविण्या ऐवजी अन्य खाद्यपदार्थ विकत असल्याचे किंवा ह्या जागा बेकायदा भाडेतत्त्वावर इतरांना देऊन व्यवसाय करणारे केंद्र चालक निदर्शनास आल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या काळात ही योजना गुंडाळण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने जून २००० मध्ये केंद्र बंद करून महापालिका व नगरपालिका तसेच जिल्हाधिकारी यांच्या मालकीच्या जागा ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते.मात्र त्या आदेशांची आजमितीस आपल्या कार्यालयाने अंमलबजावणी केलेली नाही व आपल्या कार्यालयाने या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्यांनतरही अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत दि. ८ जानेवारी २०१६ रोजी काढलेल्या आदेशानुसार झुणका-भाकर केंद्रांच्या जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. परंतु आपल्या कार्यालयाने सदर त्याही आदेशाला केराची टोपली दाखवली आहे त्यामुळे आपल्या अधिकार क्षेत्रात एका झुणका-भाकर केंद्र धारकांला आठवडी बाजारात टेबल टाकून झुणका-भाकर केंद्र सुरू करुन विक्री करण्याची परवानगी होती पण सदर झुणका-भाकर केंद्र चालकाने शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून नियमबाह्य पद्धतीने झुणका-भाकर केंद्राच्या नावाखाली शासनाची मोक्याच्या ठिकांणची जागा बळकावली आहे अशा झुणका-भाकर केंद्र चालकाला नगरपरिषद प्रशासनाने कोणत्या आधारावर जागेचे हस्तांतरण दिले तसेच आजही काही झुणका -भाकर केंद्राच्या नवावर काही केंद्र चालकांनी शासनाच्या जागेवर ताबा करून ह्या जागा अवैधरित्या इतरांना भाडेतत्त्वावर किंवा इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी दिलं आहे व त्या व्यवसायातून हे केंद्र चालक अवैधरित्या दरमहा भाडे वसूल करीत आहेत अशा झुणका-भाकर केंद्राच्या नावाखाली अवैधरीत्या जागा बळकविणारे केंद्र चालकांची सखोल चौकशी करून या सर्व झुणका-भाकर केंद्र चालकांना तात्काळ नोटीस बजावून या जागेवर इतर व्यवसाय सुरू केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच शासनाने आदेश पारित केला तेव्हापासून आजपर्यंत शासनाच्या नियमानुसार अवैधरित्या या जागेवर ताबा करणारे केंद्र चालकांकडून अवैधरीत्या या जागेचा वापर केल्याप्रकरणी १५ दिवसाच्या आत शासनाच्या नियमानुसार भाडे वसूल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे