ईतर

नगरसेवकांनी राजकारणातून समाजकारण करावे — दिगंबर जगताप मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार

छत्रपती शिवराय जयंतीसाठी पुढाकार घ्या!—शरद मैंद...

पुसद  : पक्ष,झेंडा कुठलाही असला तरी समाजाच्या हितासाठी व समाजाने दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी निवडुण आलेल्या मराठा समाजातील नगरसेवकांनी ८०% समाजकारण व २०% राजकारण असे गणित ठेवून राजकारणाचा समाजकारणासाठी सदुपपयोग करावा असे आवाहन मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष दिगंबर जगताप यांनी केले.
ते पुसद येथील मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा समाजातील निवडुन आलेल्या नगरसेवकांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वाढदिवसा निमित्त नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राजाभाऊ देशमुख,शरद मैंद,अनिरुध्द पाटील चोंढीकर,ॲड.रमेश पाटिल,क्रांती पाटील कामारकर,सुधिर देशमुख,शुभांगी पानपट्टे, वर्षाताई पाटिल आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व जिजाऊंच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले.सुधिर देशमुख यांनी जिजाऊ वंदना सादर केली.या नंतर नवनिर्वाचित सदस्य अँड.भारत जाधव,दिपक काळे,अभिजीत पानपट्टे,राजु सोळंके,शिल्पा देशमुख,दिपाली जाधव व ऐश्वर्या बोरकर यांचा शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड.रमेश पाटिल यांनी पुसद शहरातील समस्यांचा उहापोह करुन निवडुण आलेल्या सदस्यांनी त्या सोडवून जनतेचे मन जिंकण्याचे काम करावे असे मत आपल्या मनोगतातुन व्यक्त केले.अॅड.भारत जाधव यांनी जनतेने व समाजाने दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगुण चांगल्या व विकासाच्या कामासाठी सहकार्य करण्याची भुमिका विषद केली.या कार्यक्रमाचे संचालन प्रा.गजानन जाधव यांनी केले तर आभार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद कदम यांनी मानले.यावेळी किरण देशमुख सवनेकर संभाजी टेटर,दिलीप पाटिल,सुशांत महल्ले,दिगंबर चव्हाण,मंचक देशमुख,विजय देशमुख,अनिल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रभाकर टेटर,प्रताप पतंगे,अविनाश अडकीने,संभाजी देशमुख,शिवाजी कदम,शशीकांत जामगडे,जनार्दन मगर,गिरिधर ठेंगे यांच्यासह मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला.कार्यक्रमाला मराठा समाजातील प्रतीष्ठीत नागरीक व महिला भगीनी उपस्थित होत्या.

 
छत्रपती शिवराय जयंतीसाठी पुढाकार घ्या!—शरद मैंद…

शरद मैंद यांनी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना शुभेच्छा देऊन नविन ताकतीने व जोमाने जनतेची सेवा करावी व पुन्हा निवडुण येण्यासाठी आपले स्थान बळकट करावे असे मत व्यक्त करत गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीव्दारे सात दिवसांचे शिवपर्व,सामान्यज्ञान स्पर्धा व भव्य दिव्य शोभा यात्रा आयोजित करण्यात येते त्याचे नेतृत्व करण्याचे भाग्य मला लाभले परंतु यावर्षी माझ्या काही वैयक्तीक अडचणींमुळे मी नेतृत्व करु शकत नसल्यामुळे शिवप्रेमींनी पुढे येऊन पुसदच्या छत्रपती शिवराय जयंतीचे नावलौकीक अबाधित ठेवावे असे आवाहन  शहरातील शिवप्रेमीनां पुसद अर्बन बॅंकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी केले.तसेच मागील २४ वर्षामध्येछत्रपतींची जयंती साजरी करत असतांना मला अनेकांचे सहकार्य लाभले त्यामध्ये पितृतुल्य माजी मंत्री मनोहरभाऊ नाईक ,माजी नगराध्यक्षा सौ अनिता काकू नाईक ,राज्यमंत्री श्री .इंद्रनीलजी नाईक ,माजी आमदार ॲड.निलयभाऊ नाईक ,माजी आमदार विजय अण्णा चोंढीकर, माजी आमदार डॉ हिराणी काका, माजी आमदार डॉ.वजहात मिर्झा,माधवराव माने काका ,डॉ नदीम साहेब,राजन मालक मुखरे ,सौ आरती ताई फुफाटे ,उमाकांत पापीनवार , विजयराव चव्हाण काका ,दिगांबर जगताप सर ,सुधीर भाऊ देशमुख , प्रकाश भाऊ पानपट्टे ,नितीन दादा पवार ,अजय क्षीरसागर ,चंद्रकांत ठेंगे सर ,राजूभाऊ साळुंके ,भारत जाधव ,अभि पानपट्टे ,वैभव फुके ,संदीप चौधरी,जामगडे सर ,अनिल चव्हाण ,मनीष अनंतवार सर तसेच भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी ,शिवसेनेचे सर्व पदाधिकारी काँग्रेस चे सर्व पदाधिकारी पुसद शहरातील विविध सामाजिक संघटना ,प्रशासनातील सर्व विभागातील अधिकारी वर्ग विशेष करून पोलीस विभागातील त्या त्या वेळेस चे DYSP व ठाणेदार ज्यांनी अतिशय चोख बंदोबस्त ठेवला तर वेळोवेळी पत्रकार बांधवांनी आप आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रातून प्रसिद्धी देऊन सहकार्य केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देणगीदार ज्यांच्या शिवाय हा जन्मोत्सव सोहळा संपन्न करण शक्य नव्हतं या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो व भविष्यात ही सर्वांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतो .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close