नगर परिषद शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन मुख्याधिकारी लघिमा तिवारी (भा.प्र.से.) यांच्या हस्ते संपन्न!

यवतमाळ :नगर परिषद शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कला महोत्सवाचे उदघाटन मंगळवार दि.७ जानेवारी यवतमाळ येथील आझाद मैदानावर मुख्याधिकारी मा.लघिमा तिवारी (भा.प्र.से.) यांचे हस्ते संपन्न झाले.
.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.गोपाळ देशपांडे (उपविभागीय अधिकारी यवतमाळ), मा.श्री.घनश्याम राठोड (जिल्हा क्रीडा अधिकारी यवतमाळ), मा.सुरेश अराख लेखाधिकारी,मा.राजेय साबळे नगर रचना विभाग प्रमुख,मा.विनोद खरात अग्निशमन विभाग प्रमुख,मा.प्रिया थुल उपमुख्याधिकारी,यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी मुख्याधिकारी मा.लघिमा तिवारी मॅडम यांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकाचे अभिनंदन केले. क्रीडा महोत्सवामध्ये सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.मा.उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी नगरपालिकेच्या विद्यार्थ्यांकरिता खेळाचे साहित्य खरेदीकरीता 3 लाख रुपये देण्याचे जाहीर केले. यावेळी पथसंंचलनचे परीक्षक म्हणून संजय कोल्हे व जितेंद्र सातपुते यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संचलन मजहर अली व मंगला वनकर यांनी केले.
प्रास्ताविक प्रशासन अधिकारी डॉ.विनोद डवले केले.आभार क्रीडा सचिव निवृत्ती आंबेकर यांनी मानले.विलास काळे यांनी खेळाडू व पंचांना शपथ दिली.यावेळी न.प.कन्या शाळा क्र.६, न.प.शाळा क्र.७ व न.प.शाळा क्र.२० येथील विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा व कला महोत्सवाचे उपाध्यक्ष तथा प्रशासन अधिकारी डॉ.विनोद डवले,क्रीडासचिव निवृत्ती आंबेकर,लक्ष्मीकांत कांबळे, अतिफ बेग,धर्मा पवार,राजु कुडमेथे, प्रमोद शिंदे,मनोहर भिसे,नानाजी तलांडे,संजय चुनारकर,सिताराम राठोड,पंतीलाल साबळे,सहसचिव प्रमोद शिंदे,सत्यम शेंबाळे,केंद्रप्रमुख विलास काळे, राजेंद्र मेनकुदळे,सर्व समिती प्रमुख, सर्व मुख्याध्यापक शिक्षक,शिक्षिका प्रयत्न केले.असे प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मीकांत कांबळे व उपप्रमुख नानाजी तलांडे यांनी कळविले आहे.



