ईतर

वेणी धरण येथील १५० मच्छीमार धडकले तहसील कार्यालयावर तहसीलदारांना निवेदनातून मांडल्या समस्या!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):- धरण येथील  तुळजाभवानी मच्छिमार सहकारी संस्थेच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेले आणि या संस्थेच्या कारभारामुळे ३०० ते ४०० मच्छीमार कुटुंबावर उपासमारीची पाळी आली असल्याकारणाने संतप्त झालेल्या मच्छीमारांच्या वतीने आज दि.१८ जुलै २०२३ ला महागाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आली. यावेळी जवळपास १५० मच्छीमार हजर होते.

वेणी धरण येथील माँ तुळजाभवानी सहकारी संस्थेमध्ये एकूण ५२ सभासद आहेत त्यापैकी ४० एकीकडे तर १२ सभासद एकीकडे असल्याचे कळाले असता संस्थेतील १२ सभासद कंत्राटदाराच्या हुकूमशाही कारभारामुळे जाचक अटी लावून “मेजर, पद्धतीचा अवलंब करून येथील पारंपारिक मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आणली आहे ,येथील काही मासेमारी बांधवांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता संस्थेचे अध्यक्ष ,सचिव यांनी त्यांच्यावर पोफाळी पोलीस स्टेशन येथे खोटा रिपोर्ट दाखल केला.माँ तुळजाभवानी मच्छीमार सहकारी संस्थेकडे वेणी धरण येथील मत्स्य व्यवसायाचा मागील अठरा ते वीस वर्षापासून कंत्राट आहे ,वर्षभराच्या कालावधीसाठी नाममात्र एक लाख तीस हजार हा कंत्राट सदर संस्थेला देण्यात येतो या प्रकल्पाचे क्षेत्रफळ ९३०हेक्टर एवढे प्रचंड आहे इतक्या मोठ्या प्रकल्पाचा कंत्राट नाममात्र किमतीत देऊन संस्था चालकांनी आजवर कोट्यावधीची कमाई केली आहे , एका मच्छीमारा ला महिन्याकाठी ८०० रुपये भरून मच्छीमारी करण्यासाठी परवाना पास देणे बंधनकारक आहे .जवळपास४००मच्छीमार या प्रकल्पात मासेमारी करतात .वर्षाकाठी लाखाची कमाई करून ही संस्था स्थानिक गरीब मच्छीमारांच्या कुटुंबावर उपासमारी लादत आहेत , याचे विरोधात उग्र झालेले मच्छीमार आज निवेदन घेऊन महागांव तहसिलवर धडकले .

वेणी धरण येथील मच्छीमारांना पूर्वीप्रमाणे परवाना पद्धतीने मासेमारी करण्याची परवानगी देण्यात यावी ,आणि २००५पासून सदर संस्थेचा शासनामार्फत कार्यालयीन चौकशी व्हावी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले ,यावेळी निवेदन देणारे अर्जदार सरपंच ग्रामपंचायत वेणी धरण ,सरपंच ग्रामपंचायत डोंगरगाव ,सरपंच ग्रामपंचायत कान्हा ,सरपंच ग्रामपंचायत पाळूवाडी ता. पुसद , सरपंच ग्रामपंचायत येहळा ता. पुसद , सरपंच ग्रामपंचायत हुडी ता. पुसद यांचे वतीने दीडशे मच्छीमारांच्या समवेत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close