ईतर

आमदार इंद्रनिल नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम;पाच हजार महिलांना व मुलींना साहित्य वाटप व लाभ मिळणार 

सौ.मोहिनी नाईक व इंद्रनिल नाईक परिवारा कडून अभिनव उपक्रम

पुसद : विधानसभेचे लोकप्रिय आमदार इंद्रनीलभाऊ मनोहरराव नाईक यांच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त २७व २८ जानेवारी रोजी भव्य ” अभिष्टचिंतन सोहळा ” चे आयोजन करण्यात आले आहे . २७ तारखेला यू.पी. चाट जवळच्या भव्य प्रांगणात वेळ सकाळी ११:०० वाजता अभिष्टचिंतन सोहळा होणार असून या सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी समाजाचे नेते तथा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा.ना.नरहरी झीरवाळ , प्रमुख उपस्थिती मदत व पुनर्वसन मंत्री मा ना. अनिल पाटील , महिला व बालकल्याण मंत्रीमा.ना.आदितीताई तटकरे उपस्थित राहणार आहेत.

यामध्ये दोनशे महिला बचत गटांना गृहनिर्माण आर्थिक सक्षम करण्यासाठी आटा चक्की मसाला कांडण यंत्राचे वाटप , दोन हजार जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या दहा वर्षाखालील विद्यार्थिनींना सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी प्रत्येकी २५० रुपये प्रमाणे प्रोत्साहन निधी भरून खाते उघडण्यात आलेल्या बँक पासबुकचे वितरण करण्यात येणार आहे , शंभर गरजू विधवा महिला भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे , आमदार इंद्रनिल नाईक यांच्या ” वारसा अखंड जनसेवेचा ” या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे .२८जानेवारी रोजी सकाळी ११:०० वा. जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सुधाकरराव नाईक प्रेक्षागृह बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय कारला रोड पुसद येथे ” तारे जमीन या ” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार इंद्रनील नाईक तर अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अंतुलकर (IPS) , आयोजन प्रमुख मोहिनी नाईक , चला हवा येऊ द्या मधील अभिनेते अंकुर वाढवे उपस्थित राहणार आहेत. २७ जानेवारी ला भव्य कुस्तीचे आयोजन स्थळ: पुसनदी बांधाजवळ वेळ दुपारी ३:०० ते १०:०० वा. २८ जानेवारीला “विदर्भस्तरीय रावजी बॉडी बिल्डिंग ” स्पर्धेचे आयोजन अग्रवाल मंगल कार्यालय पुसद येथे सायंकाळी ७:००वा होणारा आहे.अशा विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या अभिष्टचिंतन सोहळ्याला जिल्ह्यातील बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन प्रमुख सौ.मोहिनी नाईक व इंद्रनिल नाईक मित्र परिवाराच्या वतीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close