किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध!

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला वर्गात संतापाची लाट आहे. याच तीव्र भावनेतून बुधवारी सकाळी ११:०० वाजताच्या दरम्यान वणी येथील टिळक चौकात कॉंग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध व्यक्त केला. किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली. यावेळी यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना आवारी, वणी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या बोबडे, सविता ठेपाले, मारेगाव महिला काँग्रेस अध्यक्षा माया गाडगे, माजी नगराध्यक्ष शालिनी रासेकर, माजी नगराध्यक्ष आशा टोंगे, माजी नगराध्यक्ष साधना गोहोकर, विजया आगबत्तलवार, वंदना धगड़ी, शारदा खाडे, संगीता खाडे, कविता चटकी, प्रमिला पावडे, ललिता बरशेट्टीवार, छाया निंदेकर, राजश्री शास्त्रकार, माया जयपूरकर, मंगला टोंगे, वर्षा बोरघाटे, उज्वला दोडके, अंतकला मासीरकर, बेबी कोललेरकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.



