सामाजिक

मराठा—कुणबी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव होणार!मराठा—कुणबी समाज पुसद व्दारा आयोजन!

पुसद : मराठा—कुणबी समाजातील इयत्ता दहावी,बारावी,नीट,जेईई,स्पर्धा परिक्षेसह कला,क्रीडा,सांस्कृतिक व आदी क्षेत्रात विशेष उल्लेखनिय व घवघवित यश संपादन करणार्‍या गुणवंतांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
गुणवंतांनी मिळविलेल्या देदिप्यमान यशाचे कौतुक करण्यासाठी मराठा—कुणबी समाज पुसदने पुढाकार घेतला असून गुणवंतांनी आपल्या गुणपत्रिका,आधारकार्डची सत्यप्रत तसेच मोबाईल नंबर पुसद येथील डाॅ.मनिष पाठक यांचे हाॅस्पिटल समोरील सुशांत मेडिकल येथे प्रत्यक्ष आणून देणे किंवा सुशांत महल्ले,दीपक काळे व शंकर गावंडे यांचेशी प्रत्यक्ष संपर्क दि.१२जुलै२०२३ पर्यंत करुन सहकार्य करावे असे आवाहन मराठा—कुणबी समाज पुसद यांनी एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे केले असून गुणवंतांनी खालील मोबाईल क्रमांक वर (९४२२१६७२९७)(९८५०६०१२२७)(९४२२११८३००) या संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close