माणुसकीची भिंत महिला सदस्याकडून सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

पुसद:माणुसकीची भिंत पुसदच्या महिला सदस्या ह्या मागीलआठ वर्षापासून थोर समाज सुधारक महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करीत आहेत.दि३ जानेवारी रोजी थोर समाज सुधारक भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त,माणुसकीची भिंत महिला सदस्यांनी माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णाल येथे सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जेवण फळे व बिस्किट वाटप करून गरजवंत महिलांना साड्या व लुगडे देऊन शिक्षणाचे महत्त्व सांगितले.यावेळेस उपस्थित मान्यवर माणुसकीची भिंतीच्या महिला सदस्या मोनिका जाधव, अर्चना गावंडे, कामीना चतुर, पूजा इंगोले, रेखा आगलावे, स्वाती भगत, प्रियंका बेले, सीमा मस्के, शकीलाबाई सय्यद, अलका आघाम, डॉ.अंकिता शेट्टे, नेहा ढेकळे, सावंत ताई, वैष्णवी जाधव, रितिका आगलावे विशाल घाटे प्रेम पौळ, शाहरुख कुरेशी, डॉक्टर अतुल रुणवाल रुग्ण मित्र फाउंडेशनचे शांतीसागर इंगोले धीरज पानपट्टे, संतोष भेंडे, ऋषिकेश पंडितकर, भारत खंदारे, आदित्य घाटे, दीपक सिंग, रवी घाटे, वेदांत घाटे, दीपक काळे शैलेश नेटकर साहिल भाऊ, आनंद शिरमवार अनिल चव्हाण, माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव, माणुसकीची भिंत उपाध्यक्ष संतोष गावंडे, माणुसकीची भिंत सदस्य अनंता चतुर मधुकर चव्हाण, दिगंबर देशमुख, धनंजय आघाम, प्रमोद ठाकूर, उपस्थित होते.



