परिवर्तन महाशक्ती महाराष्ट्राला तिसरा पर्याय देणार-मनीष जाधव शेतकरी नेते!

पुसद: राज्याच्या राजकारणात भाजप, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिंदे गट यांची महाविकास आघाडी एकमेकांसमोर उभी ठाकली आहे. आता आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन तिसरी आघाडीची स्थापन करण्यात आली. महायुतीमधून बाहेर पडत ‘प्रहार’ संघटनेचे बच्चू कडू, ‘स्वाभिमानी शेतकरी’ संघटनेचे राजू शेट्टी तसेच ‘स्वराज्य’ संघटनेचे संभाजीराजे यांनी एकत्रित ‘परिवर्तन महाशक्ती’ या तिसऱ्या आघाडीची पुण्यात पत्रकार परिषदेत घोषणा केली.
यावेळी इतर छोट्या पक्षांना सोबत येण्याचे आवाहन तिघांनी केले.यंदा राज्यात तिसऱ्या आघाडीची घोषणा झाल्याने विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या तिसऱ्या आघाडीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.त्या अनुषंगाने पुसद विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य शेतकरी , शेतमजूर , श्रमजीवी , कामगार यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी ना जातीसाठी , ना धर्मासाठी आम्ही लढतो दुर्लक्षित व उपेक्षित घटकांच्या न्याय हक्क व अधिकारासाठी ” असा जिल्ह्यातील तिसऱ्या आघाडीत सहभागी होणाऱ्या नेत्यांनी व्यवस्था परिवर्तनाचा आता निर्धार केला आहे.तसेच शेतकरी , शेतमजूर , कामगार , श्रमजीवी सर्वसामान्य माणसाला या छत्रपती शिवरायांच्या युक्तीने व फुले , शाहू , आंबेडकरांच्या विचारा वर चालणाऱ्या या पुरोगामी महाराष्ट्राला प्रस्थापित राजकीय व्यवस्थेच्या जोखडातून शोषणमुक्त करण्याचा निर्धार या परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी केला आहे या महामेळाव्याला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला हजारोच्या संख्येने राज्यभरातून कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित झाले होते या परिवर्तन महाशक्तीच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे वंशज छत्रपती संभाजी राजे स्वराज पक्ष , शेतकऱ्यांचे असंतोषाचे जनक- माजी खासदार शेतकरी नेते राजूभाऊ शेट्टी , विदर्भ जन आंदोलन समितीचे माजी आमदार वामनराव चटप , ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे , महाराष्ट्र राज्य समिती , भ्रष्ट व्यवस्थेवर प्रहार करणारे जनसामान्य व दिव्यांगाचे आधारस्तंभ प्रहार संघटनेचे आमदार बच्चुभाऊ कडू, नारायण अंकुशे — भारतीय जवान किसान पार्टी , गजानन भाऊ अमदाबादकर ज्येष्ठ , शेतकरी नेते शेतकरी नेते मनीष जाधव प्रदेश प्रवक्ता स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह राज्यातील एकूण विविध शेतकरी व सामाजिक संघटनांनी या परिवर्तन महाशक्तीच्या विधायक लढ्यात सहभाग घेऊन व्यवस्था परिवर्तनाचं काम करण्याचा निर्धार संकल्प या महामेळावाच्या माध्यमातून करण्यात आला या सर्व मान्यवरांनी या मेळाव्याला संबोधित करून राज्यातील उपस्थित असलेल्या सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागून परिवर्तन महाशक्तीचे विचार अधिकारापासून वंचित असलेल्या उपेक्षित घटकापर्यंत पोहोचण्याचे आदेश या नेत्यांनी दिल्याने पुसद विधानसभा मतदार संघात परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या सहभागी असलेले नेते कामाला लागले असल्याने महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्याची डोके दुखी वाढणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.