सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलचा प्रभावी वापर करत पुसद पोलिसांनी वर्षभरात हरवलेले ३९ मोबाईल फोन शोधून संबंधितांना केले परत!
आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले.

पुसद : पोलीस उपविभागातील पोलीस पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस दलाने सेन्ट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलचा वापर करत,चोरीस गेलेल्या आणि गहाळ झालेल्या सुमारे ३९ मोबाईल फोन्सचा शोध घेण्यात यश मिळवले आहे. हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेऊन, सदर मोबाईल फोन संबंधित तक्रारदारांना पुसद उप विभागाचे पोलीस सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांच्या हस्ते परत केले. यावेळी हरवलेले आणि चोरीला गेलेले आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले.
याबाबत पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज मीडियाला’ दिलेली माहिती अशी की पुसद पोलीस उपविभागातील सर्वच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी असल्या नागरिकांचे गहाळ झालेल्या किंवा चोरी गेलेल्या मोबाइल फोनचा शोध घेण्याकरिता केंद्र सरकारने सीईआयआर असे पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलचा वापर करुन नागरिकांच्या हरवलेल्या मोबाइल फोनचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्यांकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पुसद उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागातील सर्वच पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना सूचना दिल्या असून त्या सुचण्याच्या आदेशाने या पोलिस अधिकाऱ्यांनी तपास पथके तयार करून सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलचा प्रभावी वापर करीत त्यामध्ये पो. स्टे. पुसद शहर कडील – १८, पो. स्टे. पुसद ग्रामीण कडील – ०७, पो. स्टे. वसंतनगर कडील -०९, पो. स्टे. खंडाळा कडील – ०५ असे एकुण ३९ मोबाईल हर्षवर्धन बी. जे. सहा. पोलीस अधीक्षक तथा उप-विभागीय पोलीस अधिकारी, पुसद तसेच पो.नि.सेवानंद वानखडे, ठाणेदार पो. स्टे. पुसद शहर, पो.नि.सतिश जाधव ठाणेदार पो. स्टे. वसंतनगर, सपोनि / आशिष चौधरी प्रभारी उपजिल्हा वाहतूक नियंत्रण उपशाखा पुसद व सपोनि/सुगत पुंडगे, पो. स्टे. वसंतनगर पुसद यांचे हस्ते दि,६ जानेवारी २०२६ रोजी मोबाईलचे मूळ मालकांना परत करण्यात आले.तसेच ज्या नागरीकांचे मोबाईल फोन हरविलेले/गहाळ झालेले आहेत त्यांनी त्यांचे हरविलेल्या मोबाईल संबंधाने संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार करणे नागरिकांना आव्हान केले आहे.यावेळी हरवलेले आणि चोरीला गेलेले आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले आहेत.



