ईतर

महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध लाल विटभट्टी कारखानाधांरक मालकांना यंदा सुगीचे दिवस!

परवान्याची मुदत संपली असतांनाही माती उत्खनन करून वीट निर्मितीचा गोरखधंदा तेजीत!

पुसद : शहरांसह तालुक्यात यंदा लाल वीटा निर्मिती करणाऱ्या कारखानदार व्यवसायीकांचा व्यवसाय सर्वत्र तेजीत सुरू असून विटांची मागणी देखील वाढली आहे. विटेचा भाव सध्या वीट भट्टीवर ८ते९ रुपये, तर जागेवर पोच केल्यास साडेआठ ते साडेनऊ रुपये दराने विक्री होत आहे. महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने व निसर्गानं साथ दिल्याने तसेच या विटांना मागणी वाढल्यामुळे वीटभट्टी निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या परवान्याची मुदत संपली तरीही शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून या विट मालकांना यंदा सुगीचे दिवस आले असल्याचे चित्र आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रदूषण मंडळाचे नियम धाब्यावर बसून विनापरवानगी माती उत्खनन करून वीटभट्ट्या अवैधरित्या सुरू असल्याचे तक्रार दिली होती. परंतु सदर तक्रारीवर या महसूल प्रशासनाने संबंधित वीट निर्मिती कारखान्यावर अजून पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही उलट यांच्या आशीर्वादाने ह्या अवैधरित्या वीटभट्टी निर्मितीचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. त्यामुळे अशा वीट निर्मिती करणाऱ्या कारखानदारवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पुसद शहरासह तालुक्यामध्ये जवळपास वीटभट्ट्या विनापरवाना वीटभट्टी व्यवसाय सर्वत्र तेजीत असून सुरू आहेत. या वीटभट्ट्या विनापरवाना माती उत्खनन करीत असून सरकारचा लाखोचा महसूल यामुळे बुडाला आहे. या शिवाय या वीटभट्ट्या निर्मितीच्या कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू असतानास कोणीही प्रदूषण नियंत्रण मंडळाची परावनगी घेतलेली नाही. हे सर्व सुरू असताना तहसीलदार महादेव जोरवर यांच्यासह मंडळधिकारी तलाठी यांचे होणाऱ्या दुर्लक्षामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात झेप न्यूज ने तहसील कार्यालयामध्ये विचारणा केली असता ३१मार्च पर्यन्त काही वीटभट्टी परवानाधारकांना परवानगी दिली होती परंतु त्या परवान्याची मुदत संपूनही ह्या वीट भट्ट्या निर्मिती कारखाचा गोरख धंदा सुरू असून अवैधरित्या माती उत्खनन सुद्धा सर्सापणे सुरू आहे . हे अवैधरीत्या सुरू असलेले वीट निर्मिती कारखाने बंद करण्याऐवजी महसूल विभागाच्या आशिर्वादाने त्या राजरोसपणे चालविले जात आहेत. तलाठी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांचा आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे. तरीही नियमबाह्य वीटभट्ट्या निर्मिती कारखाने सुरू असताना यातून निघणाऱ्या प्रदूषणाकडे प्रदूषण मंडळ का.? चुप्पी साधून आहे, याबाबत शहरासह ग्रामीण भागात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. शहरालगत काही भागात शाळा- महाविद्यालय परिसराला वीटभट्ट्यांच्या प्रदूषणाचा प्रचंड नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या प्रदूषणामुळे वीटभट्ट्यांचे तापमान परिसरातील महाविद्यालय आणि तेथून ये-जा करणाऱ्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरत आहे. या प्रदूषणाचा धोका लक्षात घेवून प्रदूषण विभागाने आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे.मात्र प्रदूषणाचे प्रदूषण मंडळाने सुद्धा धृतराष्ट्राचे सौंग घेतले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या वीटभट्ट्या निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना ३१ मार्चपर्यंत विटा निर्मिती करण्याची मुदत होती तसेच ज्या सर्वे नंबरमध्ये माती उत्खनन करण्याची परवानगी दिली होती ती मुदत संपली तरी हे वीट निर्मिती करणारे कारखाने अवैधरीत्या राजरोसपणे आजही सुरू आहेत त्यामुळे यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी महसूल विभागाच्या कार्यक्षेत्रात ४८ लाल विटा निर्मिती कारखान्यासह तसेच अवैधरीत्या सुरू असलेल्या वीट निर्मिती कारखान्यासह त्या कारखाना चालकावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व नियम धाब्यावर बसून तसेच अवैधरित्या गौणखणीज(माती) उत्खनन करीत लाल विटांची अवैधरित्या निर्मिती व विक्री करीत शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवला बुडविल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन गौणखनिज अधिनियमान्वये १९६६ चे कलम ४७ (७) (८) नुसार दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करून दंड वसूल करण्यात यावा
या संदर्भात तक्रार दाखल केली होती परंतु तहसीलदार पुसद यांनी दि. २३ एप्रिल २०२५ रोजी पत्र क्रमांक/असं.का/प्रस्तु.२कावि/४२५ नुसार मंडळाधिकारी पुसद/खंडाळा/ बोरी/ जांबजार /शेंबाळपिंपरी/ बेलोरा/ ब्राह्मणगाव/ वरूड /गौळ. यांना चौकशी करून कारवाईचा अहवाल तहसीलदार पुसद कार्यालयाकडे सादर करण्यास सांगितले आहे तरीही संबंधित महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे या वीटभट्टी निर्मिती करणाऱ्या कारखानदाराचा अवैध व्यवसाय सर्वत्र तेजीत सुरू आहे.तर महसूल प्रशासन धृतराष्ट्राचे सोंग घेऊन बसले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close