महागांव तालुक्यातील रूग्णांनी शिबीराचा लाभ घ्यावा !

महागाव/प्रतिनिधी(संदीप ढगे): ययाती भाऊ नाईक मित्र मंडळ पुसद, स्माईल ट्रेन संस्था अमेरिका, श्रीराम हॉस्पिटल अकोला तसेच आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मा. श्री ययातीभाऊ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये जन्मापासून दुभंगलेल्या, फाटलेल्या वोठ व टाळूच्या रुग्णाकरिता भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे. लहान मुलांच्या हृदयातील छिद्र असलेल्या रुग्णांकरिता मार्गदर्शन करून शस्त्रक्रिया योजना मोफत करण्यात येणार आहे.शिबिरामध्ये स्त्रियांच्या स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची पूर्व मोफत तपासणी सुद्धा या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे.मा. श्री ययाती भाऊ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिरामध्ये बाळांचे जन्मापासून दुभंगलेले फाटलेले ओठ, टाळू यामध्ये आलेली चेहऱ्यावर अन्य विकृती, नाक तोंडात छिद्र असल्याने अन्न गिळण्यास त्रास, मुलांचे शब्द उच्चारण्यास व्यत्यय, आदीवर तपासणी करून निवडक रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी श्रीराम सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अकोला येथे पाठवण्यात येणार आहे. शिबिरामध्ये निवड झालेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. रुग्णाला व त्याचे एका नातेवाईकाला शस्त्रक्रियेसाठी प्रवास खर्च व आहार खर्च देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णाला एका वर्षाकरिता संपूर्ण औषधी मोफत देण्यात येणार आहे. असे आवाहन ययाती भाऊ नाईक मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.ययाती भाऊ नाईक मित्र मंडळ यांच्या वतीने हंसराज मोरे, उकंडा राठोड, उज्ज्वल रणवीर, अविनाश पवार, संजय राठोड, मनोहर चव्हाण, संदीप व्यवहारे, सुजित चव्हाण,मो. शरिख, शरद काळे,हेमराज राठोड, वसंत जाधव, राहुल खंडागळे, आशिष बोके, संजय जाधव, तेजस वाघमारे, शैलेश राठोड, गोपाल राठोडआदींनी गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.



