महागांव पो.स्टे.च्या हद्दीत!पुलाच्या बांधकामावरील लोखंडी गज (रॉड) चोरतांना दोन चोरट्यांना मुद्देमालासह रंगेहाथ अटक;स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई!

महागांव /प्रतिनिधी: पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुनुना शेततळ्या जवळ पुलाचे बांधकामाचे सुरु आहे त्या बांधकामांवरील लोखंडी बिम (गज) चोरी करणा-या दोन चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेवून रंगेहाथ अटक केली असून या चोरट्यां विरुद्ध महागांव पोलीस स्टेशन अप क्रमांक ४९७/२०२५ कलम ३०३ (२) भान्यास प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पुलाच्या बांधकामावरील लोखंडी गज (रॉड) चोरी करणाऱ्या चोरट्यांची नांवे १) विशाल दिलीप इंगोले वय २२ वर्ष २) राम विठ्ठल दवने वय २० वर्ष दोन्ही रा. जनुना ता. महागांव जि. यवतमाळ अशी आहेत.
याबाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की,यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने दि ७ ऑगस्ट २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात गस्त (पेट्रोलींग) घालत असतांना पोलीस स्टेशन महागांव हद्दीत असतांना नमूद पथकांस गोपनिय माहीती मिळाली कि, काही दिवसापूर्वी चोरट्यांनी करंजखेड पुलावरील बांधकामाचे लोखंडी बिम गज (रॉड)चोरी करुन नेले होते.नमूद माहीतीच्या आधारे नमूद पथकांने पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफिने इसम नामे १) विशाल दिलीप इंगोले २) राम विठ्ठल दवने ३) अक्षय ऊर्फ बदक्या दिपक खिलारे सर्व रा. जनुना ता. महागांव यांची माहीती काढली असता नमूद इसमा पैकी इसम नामे) विशाल दिलीप इंगोले २) राम विठ्ठल दवने हे मौजे जनुना फाटा येथे स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक एमएच २९बियु ३४७५ यांचेसह थांबले असल्याबाबत माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ सदर ठिकाणी रवाना होवून या अरोपी नामे १) विशाल दिलीप इंगोले २) राम विठ्ठल दवने यांना स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक एमएच २९बियु ३४७५ सह ताब्यात घेवून पोलीस कौशल्याचा वापर करुन विश्वासात घेवून गुन्ह्यांच्या अनुषंगाने व चोरीस गेलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी १) विशाल दिलीप इंगोले यांनी सांगितले कि, त्यांनी तसेच त्याचे साथीदार २) राम विठ्ठल दवने यांना ३) अक्षय ऊर्फ बदक्या दिपक खिलारे सर्व रा. जनुना ता. महागांव असे मिळून नमूद मोटार सायकलवर जावून सदर पुलाचे बांधकामाचे लोखंडी बिम चोरी केल्याचे कबूल करुन सदरचा मुद्देमाल लोखंडी बिम जनुना शेतशिवारातील राजकुमार नरवाडे यांचे शेततळयात टाकले असल्याचे सांगितल्याने सदर चोरीचा मुद्देमाल पंचा समक्ष राजकुमार नरवाडे यांच्या जनुना शेतशिवारातील शेततळयातून पुलाचे बांधकामांचे प्रत्येकी २० फुट लांबीचे ३ लोखंडी बिम किंमत १८०००/- जप्त करुन ताब्यात घेतला असून या गुन्हयात वापरेलेली मोटार सायकल किंमत ६००००/- रु असा एकूण ७८०००/- रु मुद्देमाल जप्त करुन नमूद मुद्देमाल जप्त आरोपी नामे १) विशाल दिलीप इंगोले वय २२ वर्ष २) राम विठ्ठल दवने वय २० वर्ष दोन्ही रा. जनुना ता. महागांव जि. यवतमाळ यांना रंगेहाथ अटक केली असून या चोरट्यां विरुद्ध महागांव पोलीस स्टेशन अप क्रमांक ४९७/२०२५ कलम ३०३ (२) भान्यास प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिकचा तपास महागांव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.सदरची हि कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो. से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो. से) सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड सा, पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफो मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.