ईतर

साक्षरता ही देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक- व्ही. बी. कुळकर्णी जिल्हा न्यायाधीश-१

पुसद:मा.उच्च न्यालयालय यांचे निर्देशानुसार तसेच यवतमाळ जिल्हा विधीसेवा समिती व पुसद तालुका विधी सेवा समिती तसेच वकिल संघ पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच कॉमन मिनीमम प्रोग्राम अंतर्गत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस तसेच न्याय चौकशी अधीन, तुरंगातील बंदयांचे हक्क व अधिकार या दोन वेगवेळया विषयांवर पुसद न्यायालयतील कॅन्टींग हॉल मध्ये ज्ञानदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्ही.बी. कुळकर्णी जिल्हा न्यायाधीश – १ तथा तालुका विधीसेवा समिती चे अध्यक्ष हजर होते. तसेच एस. एन. नाईक, सह. दिवाणी न्यायाधीश व स्तर, पुसद, एन. जी. व्यास साहेब, दिवाणी न्यायाधीश क. स्तर पुसद व्ही. एस. वाघमोडे, ३ रे सह दिवाणी न्या. क. स्तर पुसद कादरी . साहेब ७ वे सह दिवाणी न्यायाधिश पुसद, व्ही. बी. चव्हण साहेब, सह दिवाणी न्यायाधिश पुसद हे हजर होते. यावेळी एस. एन. नाईक, सह, दिवाणी न्यायाधीश व. स्तर यांनी सदर विषयावर मार्गदर्शन करताना साक्षरते मुळे समाजाची खुब प्रगती होते व सवांगीन विकास होतो. त्यांनी साक्षरतेचा संबंध हा देशाच्या प्रगतीशी आहे असे आर्वजुन म्हटले व आपण ब- याच प्रमाण साक्षर झाले आहे असे ही म्हटले तसेच त्यांनी दुस-या विषयावर न्याय चौकशी अधीन व तुरुगांतील बंदयांचे हक्क व अधिकार या विषयावर देखील मार्गदर्शन केले. व कायदयातील तरतुदी सांगितल्या त्यानंतर मस्के न्यायाधिश साहेब यांनी देखील साक्षरता या विषयावर तसेच न्याय चौकशी अधीन तुरंगातील बंदयांचे हक्क व अधिकार या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.त्यानंतर पुसद विधीसेवा समितीचे अध्यक्ष व ज्ञानदान कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही. बी. कुळकर्णी जिल्हा न्यायाधिश साहेब क्र. १ पुसद यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषनामध्ये साक्षरता भारत मिशन ही योजना देशात राबविल्या जात आहे. व साक्षरतेसाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. साक्षरतेमुळे नैतीकता व नितीमुल्य यांचा देखील विकास होत असतो तसेच साक्षरतेमुळे मानवी जिवन हे सुखकर बनते. आपला देश हा निरनिराळ्या खेडयांमध्ये बहुतांशी वसलेला आहे. त्यामुळे आपल्या समाजाला विकसित करण्याच्या दृष्टीने साक्षरता अत्यंत आवश्यक आहे. अशीक्षित व निरक्षर लोक हे बहुतांशी ग्रामीन भागातच राहत असल्याने त्यांच्या अशिक्षीत पणाचा फायदा घेवुन काही चतुर व्यक्ती त्यांच्या स्वताच्या लाभासाठी ग्रामीन भागातील लोकांच्या अशिक्षीतेचा फायदा घेत असतात व त्यांची फसवणुक करत असतात त्यामुळे सर्व समाजाला साक्षर करणे गरचे आहे. साक्षरता म्हणजे केवळ वाचन करणे व लिहीता येणे असे नसुन समाजाची मानिसिक शारीरिक अध्यात्यमिक व नैतिक उन्नती होणे हे अभिप्रेत आहे. साज्ञरतेचा संबंध आर्थीक सामाजीक व सर्वांगीन विकासासी आहे. केवळ अक्षर ज्ञान म्हणजे साक्षरता नसुन देशाच्या प्रगती साठी आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त करणे होय. साक्षरतेचा अर्थ व्यापक आहे. त्यात शिक्षणाचा प्रसार देखील होण गरजेचे आहे.८ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आहे. या दिवशी लोकांनी साक्षर होऊन स्वताच्या आपलया कुंटुबांचा विकास करावा या साठी हा दिवस साजरा करण्यात येतो. साक्षरतेमुळे विज्ञान व तंत्रज्ञान कमालीचा विकास झालेला आहे. त्यामुळे आपल्या देशातील सर्व लोक साक्षर होण्यासाठी आपल्याला सात्यत्याने जनजागरण करण्याची गरज आहे असे संबोधीत केले. त्यांनी जेल मधील बंदयाचे अधिकार तसेच न्याय चौकशी अधीन बंदयाचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन करतानी न्यायालयीन बंदयाचे अधिकार काय आहे व भारतीय राज्य घटने मध्ये काय तरतुदी आहे हे विषयावर सांगितले व बंदयांच्या अधिकारांची कोणतीही पायमल्ली होणार नाही या बाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला पुसदच्या बाररुमचे अध्यक्ष ॲड. खराटे साहेब तसेच ॲड. श्वेता पांढरीपांडे, ॲड. सुचीता नरवाडे ॲड. जयश्री देशमुख, ॲड महेश पाठक, ॲड. ममता सगणे, ॲड. अढाव ॲड. वर्षा कावडे, ॲड. दिनेश एम. राठोड, ॲड. गांवडे व पुसद न्यायाल्याचे अधिक्षक विलास बंगाले, श्रीमती काळबांडे मॅडम, श्रीमती बेले मॅडम, यावले बाबु, पोलिस कर्मचारी नितिन तुमडाम प्रदिप पवार संतोष राठोड निलेश खसाळे, शिपाई स्वप्नील जोशी, भितकर तसेच ईतर न्यायालयीन कर्मचारी मोठया संख्येने हजर होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. जयश्री देशमुख व आभार प्रदर्शन ॲड. श्वेता पांढरीपांडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close